क्राईम
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24 )अवैध गुटखा वाहतुकीवर पोलीसांनी धडक कारवाईत १ लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन एका आरोपीस अटक केली आहे .
आधारे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे याच्या आदेशाने पोलीस हवालदार सुदिक, पोलीस हवालदार सांगळे , पोलीस हवालदार भवर यांनी शिरूर येथील न्हावरा फाटा येथे कानिफनाथ मंदिराजवळ ता. शिरूर, जि.पुणे येथे काळी पिवळया रंगाची पॅसेजर रिक्षा
नं. एम.एन.१२ आर. पी. २६७२ या वर छापा कारवाई करून एकूण ४४,०००/- रू किंमतीचा हिरा पानमसाला गुटखा व रॉयल ७१७ कंपनी सुगंधित तंबाखु सह पॅसेंजर रिक्षा एक लाख रुपये किंमतीची असा एकूण १,४४,०००/- रु.किंमतीचा माल जप्त केला . या कारवाई मध्ये संगमनाथ नागनाथ कनजे रा. शिक्षक कॉलनी, रामलिंग रोड, शिरूर, ता. शिरूर, जि.पुणे व दिपक गुगळे रा. वनविभाग कार्यालया शेजारी, शिरूर, ता शिरूर, जि पुणे याचे विरुध्द शिरूर
पोलीस स्टेशन येथे गुरनं ४०५/२०२५ मा.न्या.स. कलम १२३, २७४, २७५, २२३ सह अन्न व सुरक्षा मानके अधिनियम २००६ से कलम २६ (२) (i), २६ (२) (ii),२६ (२) (iv),२०(३) (d), ३०(२) (a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सगमनाथ कनजे यास अटक करण्यात आली असून दिपक गुगळे याचा शोध चालु आहे

