Related Articles
Check Also
Close
शिरूर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)“भाषण म्हणजे राजकारण नव्हे, तर प्रभावीपणे स्वंत:चे मत मांडण्याचे सशक्त माध्यम आहे,” असे मत प्रभावी वक्ता व ‘आर्ट ऑफ स्पीच’ संस्थापक रावसाहेब चक्रे यांनी व्यक्त केले.
गंगा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने शिक्षकांसाठी आयोजित ‘भाषण व सूत्रसंचालन कौशल्य कार्यशाळा’ मध्ये ते बोलत होते.
यावेळी उपस्थित शिक्षकांना संवाद, भाषण व सूत्रसंचालनाचे महत्त्व, शैली आणि व्यावसायिक संधी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.


कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणादायी ठरले असून संवादकौशल्य ही आजच्या युगातील महत्त्वाची गरज असल्याचे मत उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केले.यावेळी ज्ञानगंगा विश्व विद्यालयाच्या शिक्षिका उपस्थित होत्या.