
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24) जागतिक पर्यावरण दिन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाचा कार्यकिर्दीस ११ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल
शहरातील पूर्वमुखी हनुमान मंदिर समोर भारतीय जनता पक्ष शिरूर तालुका मंडलचा वतीने “एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत ५० विविध प्रकारची देशी झाडे लावण्यात येवून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष राहूल पाचर्णे म्हणाले की पर्यावरण रक्षण ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे . वृक्षसंवर्धनाचा आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करुन सर्वांनी वृक्ष लावण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले .
यावेळी शिरूर शहर भाजपा अध्यक्ष माजी नगरसेवक नितीन पाचर्णे, कामगार मोर्चा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप हिंगे , उपजिल्हाध्यक्ष मितेश गादिया महिला मोर्चा प्रदेश सचिव रेश्मा शेख , अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष राजू शेख , माजी नगरसेवक संदीप गायकवाड, माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे , भाजपा सरचिटणीस विजय नरके , अविनाश जाधव , युवा मोर्चा अध्यक्ष तुषार भदाणे ,
जिल्हा संयोजक बेटी बचाव बेटी पढाव अनघा पाठकजी , भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष प्रिया बिरादार , अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा सरचिटणीस शहा , शिरूर भाजपा उपाध्यक्ष नीलेश नवले , सागर सातारकर, उमेश शेळके सचिन गरुडे , राजेंद्र महाजन , आकाश चाकणे ,ओबीसी मोर्चा अध्यक्ष भाजपा करण खांडरे , शिरूर भाजपा उपाध्यक्ष राहील शेख , अक्षय महाराज बटवाल, महेश स्वामी आदी यावेळी उपस्थित होते.
वृक्षारोपन कार्यक्रम पूर्वी शिरूर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुजरात मध्ये झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यात आली .
oplus_131074