Uncategorizedविशेषशैक्षणिक

डेक्कन स्कूल मधील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी बैलगाडी सफर 

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)आज राज्यभरातील शाळा उन्हाळी सुटीनंतर पुन्हा सुरु झाल्या . इतक्या दिवस बंद असलेले शाळेंचे व्हरांडे आज मुलांच्या शाळेतील आजच्या आगमनाने पुन्हा एकदा बोलके झाले. शिरुर शहर व तालुक्यातील विविध शाळामध्ये मुलांचे उसहात स्वागत करण्यात आले . कोठे गुलाबपुष्प देत तर कोठे खाउ देवून तर कोठे वाद्यांच्या गजरात मुलांचे स्वागत करण्यात आले .
शहरातील बाबूराव नगर येथील डेक्कन एज्युकेशन इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्याना  बैलगाडीतून फेरफटका मारुन स्वागत करण्यात आले .
शाळेच्या पहिल्या दिवशी डेक्कन स्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे औक्षण करून तसेच चॉकलेट्स देऊन विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश झाला. शाळेची प्रार्थना झाल्यावर मैदानावर सजवलेल्या बैलगाडीचे आगमन झाले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी बैलगाडी मध्ये बसून शाळेच्या मैदानास फेरफटका मारला. या अनोख्या स्वागताने सर्वच विद्यार्थी भारावून गेले होते. अनेक विद्यार्थ्यांनी व पालकांनी शाळेने तयार केलेल्या सेल्फी पॉइंट वर उभा राहून शाळेतील पहिल्या दिवसाची प्रवेशाची सेल्फी काढली. इयत्ता चौथीच्या वर्गशिक्षिका शीतल ढवळे यांनी वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिवदुर्गाची सजावट केली होती. विद्यार्थ्यांना शिवमुद्रा आणि वेगवेगळ्या मावळ्यांची नावे असलेले स्टिकर देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या गमतीशीर खेळांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक डॉ. समीर ओंकार यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. शाळेतील शिक्षिका जयश्री दांडगे, अक्षता दिवेकर, लहू धारजे यांनी सर्व उपक्रमांचे नियोजन केले.

शिरुर नगरपरिषद शाळा क्रमांक -४ सेंटर शाळेत ही मुलांचे स्वागत मुख्याध्यापक संजय वाघ यांनी केले .

मातोश्री गंगूबाई प्रभू घावटे यांना डेली न्यूज पोस्ट २४ च्या वतीने भावपूर्ण आदरांजली .
मातोश्री गंगूबाई प्रभू घावटे यांना डेली न्यूज पोस्ट २४ च्या वतीने भावपूर्ण आदरांजली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button