Uncategorized

राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब अभिवादन यात्रेचे शिरूर मध्ये स्वागत

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा ते समाधीस्थळ पाचाड अशी अभिवादन यात्रा जिजाऊ माँ साहेब यांच्या पुण्यतिथी

निमित्त काढण्यात आली असून सिंदखेडा येथून निघालेल्या या यात्रेने शिरूर मध्ये प्रवेश करत पुणे जिल्ह्यात आगमन केले.

शिरूर शहरात या यात्रेचे स्वागत बाबुराव नगर येथे करण्यात आले.
यावेळी गणपत ढगे , भूमचे गणेश लोखंडे , बीडचे नितीन धांडे ,छत्रपती संभाजी नगरचे गणेश लोखंडे , धुळे येथील कैलास पाटील ,जामनेरचे दत्तु पाटील , जालनाचे बाळासाहेब देशमुख , राहूल भागवत ,गीतांजली आढाव ,अर्चना भागवत,आखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे, माजी सरपंच जिजाबाई दुर्गे,राणीताई कर्डीले, योगेश देशमुख , विजय काकडे .गणेश देशमुख, सकल मराठा समाज संघ विश्वस्त रामभाऊ इंगळे आदी उपस्थित होते.
या यात्रेचे आयोजन लखूजी जाधव यांचे ११ वे वशंज शिवाजीराजे जाधव यांनी केले आहे .
यावेळी बोलताना जाधव म्हणाले की मागील चार वर्षा पासून राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांचे जन्मस्थळ असणारे सिंदखेड राजा या जन्मस्थळा पासून त्यांचे समाधीस्थळ असणारे रायगड जवळील पाचाड पर्यत जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन यात्रा काढण्यात येते. 17 जुन रोजी ही यात्रा पाचाडला पोहोचणार असून 22 जिल्ह्यातुन शिवप्रेमी या यात्रेत सहभागी झाले आहेत . दिवसेंदिवस या यात्रेत लोकांचा सहभाग वाढत आहे. सध्या राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे महत्वाचे किल्ले व शिवनेरी रायगड अश्या विविध ठिकाणी जाण्यासाठी विशेष रेल्वेगाडी सुरू केली आहे. यात सिंदखेड राजा चा ही समावेश करावा अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांनी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांना दिली. जिजाऊ माँ साहेब यांचा जीवनकार्याचा अभ्यास करावा असे आवाहन त्यानी केल.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी करून समाजातील युवकांनी उद्योग धंदाची कास धरावी असे ही ते म्हणाले .
रांजणगाव येथील महागणपती मंदिरात जाऊन जाधव यांनी महागणपतीचे दर्शन घेतले . यावेळी महागणपती देवस्थानचे तुषार पाचुंदकर व सामाजिक कार्यकर्ते संतोष सांबारे यांनी त्यांचे स्वागत केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button