Uncategorizedमहाराष्ट्र

योग्य ठिकाणी पार्किंग न करणा-यांन विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा पोलीस स्टेशनचा इशारा

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
मुलांना शाळेत सोडण्यासाठी येणा-या पालकांनी आपल्या वाहनांचे पार्किंग योग्य ठिकाणी करावे व वाहतूक पोलीसांनी दिलेल्या सूचनाचे पालन करावे . योग्य ठिकाणी पार्किंग न करणा-यांन विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिला आहे .
त्यांनी सांगितले की शिरूर शहरा मधील विद्याधाम प्रशाला समोर, विद्याधाम चौकामध्ये, निर्माण प्लाझा तसेच सी. टी . बोरा कॉलेज रोड वर मोठ्या प्रमाणात पालकांची विद्यार्थ्यांना शाळेत सोडवण्यासाठी व आणण्यासाठी जा ये चालू असते. बरेच पालक आपल्या ताब्यातील मोटर सायकल रोडवर कोठे ही पार्क करतात, मोटर सायकल घेऊन विरुद्ध दिशेने प्रवास करतात .या कारणामुळे शिरूर शहरातून एस.टी स्टँड कडे व बाबुराव नगर कडे जाणारा मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. सर्व पालकांना आवाहन करण्यात आले कीए आपल्या ताब्यातील वाहन योग्य प्रकारे पार्क करावे व वाहतूक पोलिसांच्या सूचनेचे पालन करावे. अन्यथा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असे केंजळे म्हणाले .
तसेच विद्याधाम प्रशाला चे प्राचार्य यांच्याशी पोलीसांनी चर्चा केली आली वाहन चालकांना वाहन पार्किंग करिता जागा उपलब्ध करून देणे व विद्यार्थ्यांना थोड्या थोड्या वेळानंतर शाळेची सुट्टी करण्या बाबत विनंती करण्यात आली आहे. जेणे करून रस्त्यावरील गर्दी चे प्रमाण कमी होऊन एक ही अपघात होणार नाही. ह्या करिता अधिक उपायोजना करत असल्याचे केंजळे यांनी सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button