विशेष
आय. एफ. बी रेफ्रिजरेशन आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपन
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)आय एफ बी रेफ्रिजरेशन आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम आई डी सी) यांच्या संयुक्त विद्यमाने रांजणगाव एम आई डी सी फेज ३ मध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.
‘एक झाड – एक जीवन’ या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात एम आई डी सी फेज ३ रोड च्या दुतर्फा जवळपास १५० वृक्षारोपण केले,
मिलिंद कासार (एम आई डी सी) व काशीराम मेस्त्री (आय एफ बी) यांनी वृक्षारोपण करून उपक्रमाची सुरुवात केली. त्यांनी सांगितले, “पर्यावरण संवर्धन ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या उपक्रमातून नवीन पिढीला निसर्गाप्रती जबाबदारीची जाणीव होईल
यावेळी एमआयडीसी चे भूषण ठाणगे व रेफ्रीजरेशन चे संतोष निंबाळकर आणि अन्य अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते .
.या वृक्षारोपण उपक्रमामध्ये विविध स्थानिक झाडांचे प्रामुख्याने बकुळ, कदंब, मोहगनी, इंडियन क्रिसमस, खाया आणि करंज यासारख्या देशी व पर्यावरणपूरक झाडांचा समावेश करण्यात आला.
