Uncategorizedराष्ट्रीयविशेष
राजर्षी शाहू विचार मेळाव्यात राजर्षी शाहु महाराज गौरव पुरस्कार साहित्यीक प्रा. डॉ . राजाभाऊ भैलूमे यांना ,आस्तित्त्व गौरव पुरस्कार शुभांगी जोगी व प्राचीताई कांबळे यांना प्रदान

शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -25)
वात्सल्य सिंधू फाउंडैशन व कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्ममानाने राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंती निमित्त शाहू विचारांच्या मेळावाच आयोजन करण्यात आले होते. 

शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे , वात्सल्य सिंधू फाउंडैशनच्या अध्यक्षा सुनंदा लंघे ,पोलीस निरीक्षक संदेश केंजळे ,आम्ही शिरुरकर फाउंडैशनचे अध्यक्ष रवींद्र सानप ,
माजी सभापती कविता वाटमारे, भरतीय जनता पक्षाच्या प्रिया बिरादार , सामाजिक कार्यकर्ते संतोष सांबारे , शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती प्रवीण गायकवाड ,शोभना पाचंगे , शशिकला काळे , मनिषा तरटे आदी उपस्थित होते .
माजी सभापती कविता वाटमारे, भरतीय जनता पक्षाच्या प्रिया बिरादार , सामाजिक कार्यकर्ते संतोष सांबारे , शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती प्रवीण गायकवाड ,शोभना पाचंगे , शशिकला काळे , मनिषा तरटे आदी उपस्थित होते .
या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज गौरव पुरस्कार बोरा महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख साहित्यीक प्रा. डॉ . राजाभाऊ भैलूमे यांना ,आस्तित्त्व गौरव पुरस्कार प्रेरणा बहुद्देशीय संस्था धुळे चे अध्यक्षा शुभांगी जोगी व प्रगती संस्था मुंबईच्या अध्यक्षा प्राचीताई कांबळे यांना वात्सल्य सिंधू फाउंडैशनचा वतीने देवून सन्मानित करण्यात आले .

पुरस्काराला उत्तर देताना डॉ . भैलूमे म्हणाले की समतेचा लढाईत महिलांची भुमिका महत्वाची आहे. सत्ता ही मोठ्या प्रमाणावर महिलांच्या हाती असली पाहिजे. महिलाच्या स्वंत :चा राजकिय पक्ष का नसावा असा प्रश्न उपस्थित करून भविष्यात महिलांचा स्वंत :चा पक्ष असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्याची सत्ता महिलांच्या ताब्यात असणार असल्याचे ते म्हणाले . विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्तेची दोरी महिलेच्या हाती असली पाहीजे . सामाजिक सुधारणाचे मोठे काम राजर्षी शाहू यांनी केल्याचे ते म्हणाले .

प्रास्ताविक उषा वाखारे यांनी केले . सुत्रसंचालन सुनंदा लंघे यांनी केले .
या मेळावा यशस्वी करण्यासाठी सुनंदा लंघे ,उषा वाखारे ,प्रेरणा वर्मा , पवित्रा गाडेकर यांनी प्रयत्न केले .


