
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
वाचनाची संगत धरा व नियमितपणे पुस्तके व वर्तमानपत्र यांचे वाचन करावे. वाचाल तर वाचाल असे ज्ञानगंगा विश्व विद्यालय शिरुरचे अध्यक्ष प्रा . डॉ . राजेराम घावटे शिरुर येथील कार्यक्रमात म्हणाले .

यशवंतराव चव्हाण सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान शिरुर यांच्या वतीने गुणवंताचा सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम जीवन विकास मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता .
यावेळी लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक , जनता दल धर्मनिरपेक्षचे संग्राम शेवाळे ,माजी उपनगराध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल , मावळाई प्रकाशनचे डॉ . सुभाष गवारी ,मळगंगा अंध अपंग संस्था टाकळी हाजी संस्थेचा अध्यक्षा जाई खामकर ,माजी मुख्याध्यापक इंद्रजित कळमकर , माजी मुख्याध्यापक कळसकर , मनसेचे माजी शहराध्यक्ष संदिप कडेकर , संजय बांडे, ,रुस्तुम सय्यद , आशिष दुगड , नीलेश नवले , वसंत बेंद्रे , डेक्कन स्कूलचे मुख्याध्यापक डॉ . समीर ओंकार , सागर नरवडे , मुख्याध्यापक गंगाधर तोडमल , विद्याधाम प्रशालेचे पर्यवेक्षक बनकर

शिरुर नगरपरिषद सेंटर शाळेच्या शिक्षीका अनिता धुमाळ , अशोक मानमोडे , माजी मुख्याध्यापिका शंकुतला रसाळ , उपस्थित होते .

कार्यक्रमात ज्ञानगंगा विश्वविद्यालयाचे अध्यक्ष प्रा. डॉ . राजेराम घावटे , नाट्य व सिने दिग्दर्शक दिपक घारु , ॲड .बाबूराव कोंडिंबा पाचंगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला .याखेरीज डॉ . शृती मिसाळ , तेजस घोरपडे , ॲड.अंवतिका नितीन गायकवाड , एस टी महिला बसचालक रेश्म ठुबे , प्रेम आतिष परदेशी ,यांच्यासह सिध्दी अभिजीत ओतारी, ,जय उमेश पंडित , भूमी महेश जंगम , पूनम दत्तात्रेय अभंग , गणेश बाळासाहेब झाडगे , कुणाल अजित शेजवळ , प्रिती नवनाथ टाक , सय्यद सदिया रफिक , राज कैलास शेजवळ , पलक मुकेश संघवी , ऐश्वर्या एकनाथ लोळगे , करण रमेश धोत्रे , रियान वसिम सौदागर , प्रतिक्षा कैलास शेजवळ , प्रांजल सुदाम शेजवळ , परी अंकुश ब्राम्हणे , श्वेता गोरख ब्राम्हणे , शिवम प्रवीण घोडके , संस्कृति आतिष परदेशी , आरुष गंगाधर तोडमल , अलिशा रफिक सय्यद , यश अनिल नवले ,अमृता संतोष शेजवळ ,युवराज मनोज ओतारी , ओम माधव मुंढे , अभिषेक दत्तात्रेय अभंग , दिया शैलेश दुगड , अशोक गजानन यांचा ही सन्मान करण्यात आला .
प्रा .डॉ. राजेराम घावटे म्हणाले की विद्यार्थ्याना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे आवश्यक आहे .विद्यार्थ्यानी अभ्यासाचा कंटाळा करु नये . वाचनाची संगत धरावी . व नियमितपणे पुस्तके वाचावित .चांगले उद्देश व संकल्प जीवनात ठेवा असे आवाहन त्यांनी केले .

ॲड .पाचंगे म्हणाले की जिद्द व चिकाटी असेल तर यश नक्की मिळते . सामाजिक न्यायासाठी वकिलीचा उपयोग करणार आहे .
यावेळी बोलताना जाई खामकर म्हणाल्या की आयुष्यात जे काही होत ते चांगल्यासाठी होते त्यामुळे आहे ती परिस्थिती स्वीकारुन त्यावर मात करावी . अंध अपंग व दुर्बल घटकांसाठी मळगंगा संस्था काम करते असे सांगून त्यांनी त्यांची वाटचाल सांगितली .

ॲड . संग्राम शेवाळे यांनी विद्यार्थ्यानी विविध विषयाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारले पाहीजे असे सांगितले .
रवींद्र धनक म्हणाले की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान शिरुर हे माणूस घडविण्याचे काम करत आहे . परिसरातील गुणवान व गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी सहाय्यक समिती स्थापन करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. आई वडिल व शिक्षकाविषयी कृतज्ञता कायम बाळगावी असे आवाहन विद्यार्थ्याना त्यांनी केले .
माजी मुख्याध्यापक कळसकर यांचे ही मनोगत यावेळी झाले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव मुंडे यांनी केले . स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बारवकर यांनी केले . सूत्रसंचालन राजेंद्र शेजवळ यांनी केले तर आभार कन्हैलाल दुगड यांनी मानले .

यावेळी जीवन विकास मंदिर , शिरुर नगरपरिषद शाळा , विद्याधाम प्रशाला माहेर संस्था , पद्मश्री सिंधूताई सपकाळ मनशांती छात्रालय , आयेशा बेगम उर्दू हायस्कूल , रयत शाळा शाळेतील मुलांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान शिरुर चे सुधाकर ओतारी ,पोपटलाल ओस्तवाल , ॲड . प्रदिप बारवकर ,मनोज ओतारी , कन्हैलाल दुगड , अभिजीत ओतारी ,बाळासाहेब झाडगे , दतात्रेय अभंग ,संतोष शेजवळ आदी यावेळी उपस्थित होते .
