क्राईम
वृद्ध महिलेच्या गळ्यातून हिसकावून नेलेले सोन्याचे मंगळसूत्र शोधून काढून संबंधित वृध्द महिलेकडे सुपुर्त .
शिरूर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24) – शिरूर पोलिसांनी पायी चालणाऱ्या ७७ वर्षांच्या वृद्ध महिलेच्या गळ्यातून हिसकावून नेलेले सोन्याचे मंगळसूत्र शोधून काढून ते संबंधित वृध्द महिलेकडे सुपुर्त केले आहे .
याप्रकरणी १) अनिल सोमनाथ गव्हाणे व २) अनिल नारायण गव्हाणे (दोघे रा. गव्हाणेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांच्या कडून चोरी केलेले मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार २७ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास संविदणे, ता. शिरूर, जि. पुणे येथील मलठण-नारायणगाव अष्टविनायक हायवे रोडवरील बंटी हॉटेलच्या पुढील कच्च्या रस्त्यावर
वत्सलाबाई दत्तात्रय सुके (वय ७७, रा. खडकवाडी, पो. लोणी धामणी, ता. आंबेगाव, जि. पुणे) या वृद्ध महिला पायी चालत असताना, दोन २० ते २५ वर्षाच्या अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे १,१०,००० रुपये किमतीचे, दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून, मोटारसायकलवरून पळ काढला होता .
याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. २१५/२०२५, भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०९(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पोलीस अंमलदार भाउसाहेब ठोसरे आणि पथकाने तपास करुन
तपासादरम्यान १) अनिल सोमनाथ गव्हाणे व २) अनिल नारायण गव्हाणे (दोघे रा. गव्हाणेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांच्या कडून चोरी केलेले मंगळसूत्र जप्त करण्यात आले.
या प्रकरणातील हस्तगत मंगळसूत्र वत्सलाबाई दत्तात्रय सुके यांच्याकडे सुपुर्त करण्यात आले आहे .ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, तसेच पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पोलीस हवालदार बापु मांगडे, पोलीस अंमलदार भाउसाहेब ठोसरे यांचा पथकाने केला .

माजी उपनगराध्यक्ष कृषिभूषण ॲड देवराम गोरडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
