स्थानिक
आनंद नागरी सहकारी पतसंस्था प्रकरणातील फरार आरोपीना अटक करण्याची मागणी

शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
आनंद नागरी सहकारी पतसंस्था प्रकरणातील फरार आरोपीना अटक करुन दोषींवर कारवाई करावी अन्यथा ठेवीदार बेमुदत उपोषण करतील असा इशारा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी निवेदनाद्ववारे दिला आहे.
याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या कडे देण्यात आले आहे .याबाबत पोलीसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की १ जुलै २०२४ रोजी पोलीस ठाण्यात आनंद नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभय चोरडिया आणि त्यांच्या कुटुंबातील पतसंस्थेचे कर्जदार यांच्याविरुध्द फिर्याद दाखल करण्यात आली आहे .
फिर्याद दाखल झाल्यावर पोलीस त्यांना अटक करतील अशी अपेक्षा होती . परंतु वर्ष पूर्ण होत आले असूनही पोलिसांना ते सापडत नाहीत. . गेल्या महिन्यापासून आम्हाला आमच्या मुलांच्या व नातवांच्या शिक्षणाची फी भरणे अशक्य आले आहे. आमच्यातील अनेक लोकाना नियमित औषधे घेणे अशक्य झाले आहे. मुलामुलीची लग्ने ठरल्याप्रमाणे करताना दुस-या लोकांकडून पैसे उसनवार घ्यावे लागत आहे . उधार उसनवारीची परतफेड अशक्य झाली आहे. या टेन्शनमध्ये चार ठेवीदार मरण पावले आहेत . नुकतेच एका ठेवीदाराचा बंधू उपचार होऊ न शकल्याने मरण पावला .

या फरार आरोपीना महिन्याभरात अटक झाली नाही तर काही ठेवीदार दि. १२ ऑगस्ट २०२५ पासून पोलिस स्टेशनसमोर आरोपींना अटक होत नाही तोपर्यत बेमुदत उपोषण व साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे .
यावेळी ॲड . सुभाष जैन,ललित सुराणा,सचिन लोढा, रामदास सरड, श्रीकांत चाबुकस्वार ,सीमा शेळके,क्षीरसागर, , सतीश छाजेड, प्रकाश येणारे, फईम सय्यद आदी उपस्थित होते .