शिरुर पोलीस स्टेशनचा वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४ )रमजान महिन्या निमित्त शिरुर पोलीस स्टेशनच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते .


यावेळी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे , माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण , मौलाना कैसर ,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद , माधव सेनेचे रवींद्र सानप , अल बैतुल माल कमिटीचे फिरोजभाई बागवान , भाजपाचे प्रवीण मुथा , प्रवासी संघाचे अनिल बांडे , बाजार समितीचे माजी सचिव दिलीप मैड , मनसेचे शहराध्यक्ष ॲड . आदित्य मैड , रवि लेंडे , आखिल भारतीय मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे , शशिकला काळे ,उद्योजिका सविता बोरुडे , खिदमत फाउंडैशनचे मुश्ताक शेख , पोलीस भाग्यश्री जाधव , शिक्षण मंडळाचे माजी सदस्य प्रवीण गायकवाड , राजेंद्र खेतमळीस ,गोपीनाथ पठारे , फिरोज शिकलगार , शिवाजी औटी ,आदी उपस्थित होते .
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे म्हणाले की समाजात भाईचारा राहण्याचा दृष्टीने सातत्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते .
जाकिरखान पठाण म्हणाले की शिरुर शहराची सलोख्याची व एकोप्याची परंपरा अबाधित राहण्यासाठी कटिबध्द राहू या .
मौलना कैसर म्हणाले की रोजे हे सर्वाना शांतीचा माणूसकीचा संदेश देतात .
यावेळी प्रास्ताविक रवींद्र सानप यांनी केले . आभार व सूत्रसंचालन फिरोजभाई बागवान यांनी केले.