राष्ट्रीय

शेतक-यांनी नव तंत्रज्ञानाचा शेतीत वापर करावा

शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24 )
शेतक-यांनी नव तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करावा असे आवाहन पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष स्वप्नील ढमढेरे यांनी केले .
कृषिदिन व माजी आमदार बाबूराव दौंडकर यांचा ३८ व्या स्मृतिदिनानिमित्त बाबूराव दौंडकर स्मारक समिती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे , राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायक थोरात , पुणे विभाग राष्ट्रीय स्वंयसेवक संघचालक संभाजीराव गवारे , बाबूराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड .धर्मेंद्र खांडरे , प्रभाकर मुसळे ,सूर्यकांत शिर्के, , ॲड. मदनदादा फराटे , संपतराव दौंडकर , दीपक टेमगिरे, देवेंद्र कोळपकर , आदी उपस्थित होते .
ढमढेरे म्हणाले की बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्या माध्यमातून शेतक -यांना मार्गदर्शन केले जात आहे . पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचा वतीने दूध उत्पादक शेतक-यांसाठी करण्यात येणार मार्गदर्शना बाबतची माहिती व विविध योजनाची माहिती देवून शेतक-यांनी शेतीत नव तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन केले .
प्रास्ताविक बाबूराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड . धर्मेंद्र खांडरे यांनी केले त्यात ते म्हणाले की
शेतक -यांचे उत्पन्न वाढावे या करिता समितीचा वतीने फार्मर प्रोड्युशन कंपनीची स्थापना करण्यात आली असून विविध प्रशिक्षणे शेतक-यांसाठी आयोजित करण्यात येतात . माती व पाणी निरीक्षण प्रयोगशाळा ही स्मारक समिती सुरु करणार आहे .
विनायक थोरात म्हणाले की शेती संदर्भातील संशोधन केंद्र उभारुन शेतीत विविध प्रयोग करावेत . ग्रामविकासाचे महत्वाचे काम स्मारक समिती करीत आहे .
तानाजी राउत , सागर फराटे , सागर डफळ आदीची मनोगते यावेळी झाली
स्वागत धनंजय गायकवाड यांनी केले .
सूत्रसंचालन विठ्ठल वाघ यांनी केले
आभार अविनाश भेगडे यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button