धार्मिंकमहाराष्ट्र
आषाढी एकादशी पंढरपूर यात्रेला जाण्यासाठी शिरुर बसस्थानकातून एस टी बसेसची व्यवस्था
शिरुर दिनांक ( वार्ताहर ) आषाढी एकादशी निमित्त शिरुर बसस्थानकातून उद्या बुधवार दिनांक २ जुलै २०२५ रोजी शिरुर बसस्थानकातून आषाढी एकादशी यात्रेसाठी पंढरपूरला जाण्यासाठी विशेष बसगाड्याची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी पंढरपूरला जाण्यासाठी सुरक्षित असा एस. टी.चा प्रवास करावा असे आवाहन शिरुर एस टी आगार प्रमुख मनिषा गायकवाड ( इनामके ) यांनी केले आहे .
याबाबतची आधिक माहिती देताना गायकवाड यांनी सांगितले की पंढरपूर आषाढी एकादशी यात्रेसाठी शिरुर बसस्थानकातून २ जुलै २०२५ पासून जादा एस . टी बस सोडण्यात येणार आहे . सकाळी दहा वाजता , दुपारी १२ वाजता व दीड वाजता शिरुर बसस्थानकातून पंढरपूरला बस रवाना होतील. शिरुर बसस्थानकातील एकूण २५ एस. टी. बसेस आषाढी यात्रेसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे .
शिरुर हून निघणारी ही बस न्हावरा- चौफुला -टेंभूर्णी मार्गे पंढरपूरला जाणार असून शिरुर ते पंढरपूरला जाण्यासाठी ३६३ रु .तिकिट आहे . त्याच बरोबर महिला , ज्येष्ठ नागरिक यांना सवलतीचा दरात तिकिट असणार आहे .४० प्रवाश्यांनी एकत्रित आगावू बुकिंग केल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र एस . टी बस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

मागील वर्षी शिरुर आगारातून आषाढी यात्रेसाठी १७ एस . टी. बसेसने १६६ फे-या द्वारे १२ लाख १३ हजार २३६ रु . चे उत्पन्न मिळवले होते .६७६८ प्रवाश्यांनी प्रवास केला होता .
पुणे येथील स्वारगेट बसस्थानकातून ही आषाढी एकादशी करीता विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले .

