धार्मिंकविशेष

साई पालखी सोहळ्यातील गोल रिंगण सतरा कमानीजवळ साईनामाचा जयघोषात संपन्न .

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट  टीम -24)
साई बाबा की जय , ओम साईराम च्या जयघोषात शिरुर येथील सतरा कमानीच्या पुलाजवळ साईबाबा पालखी सोहळ्यातील रिंगण सोहळा पार पडला . मोठ्या संख्येने साईभक्त यावेळी उपस्थित होते .रिंगण सोहळानंतर पालखी सोहळ्याने सतरा कमानीचा पूल ओलांडून  पुणे जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश केला .

तत्पूर्वी सायंकाळी शिरुर शहरातून जाणा-या पुणे -अहिल्यानगर महामार्गाने साईबाबा पालखी सोहळ्याने शिरुर शहरात प्रवेश केला. यावेळी ठिकठिकाणी  गुलाबपुष्पांच्या पायघड्या घालून साईनामाचा गजर करण्यात आला .

oplus_131074
 गेला .पुणे नगर रस्त्यावर प्रीतम प्रकाश नगर व मंगलमुर्तीनगर , पवार मळा जवळ पालखी सोहळ्याचा स्वागता करीता स्वागत कमानी उभारुन सजावट करण्यात आली होती .त्याच बरोबर खाद्यपदार्थ, फळे , पाणी बॉटल , आदीचे ही वारक-यांना वाटप करण्यात आले. पालखी सोहळा पाबळ फाटा, शिरुर बसस्थानक , जुने नगरपरिषद कार्यालय , विद्याधाम प्रशाला मार्गे साई मंगल गार्डन येथे मुक्कामासाठी विसावला .त्याठिकाणी स्वागत व महाप्रसादाची व्यवस्था  विजय साखला परीवाराचा वतीने करण्यात आली होती . साईबाबांची आरती व दर्शनासाठी साईभक्तांनी मोठी गर्दी केली होती .

  आज सकाळी पालखी सोहळ्या पुणे अहिल्यानगर रस्त्यावरुन शिरुर तहसिल कार्यालया समोरुन जोशीवाडी कडे मार्गस्थ झाला .यावेळी पालखीच्या अग्रभागी एकलव्य ढोल ताशा पथक होते . पुणे नगर महामार्गावरील घोडनदीवरील सतरा कमानीचा पुलाजवळ पालखी सोहळा पोहचल्यावर नयनरम्य असा रिंगण सोहळा पार पडला . रिंगण सोहळाच्या ठिकाणी आकर्षक अश्या रांगोळ्याच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. साईनामाचा गजर करीत मोठ्या उत्सहात रिंगण सोहळा पार पडला . मानाच्या अश्वाने प्रदक्षिणा घालत गोल रिंगण पूर्ण केले .

oplus_131074
रिंगण सोहळा पार पडल्यावर साई भक्तांनी फुगड्यांच्या फेर धरला व साई भक्तीच्या गाण्यांवर ठेका धरत नृत्य ही केले .
याठिकाणी साई भक्तांना हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचा वतीने नाष्टाचे वाटप करण्यात आले .तर रासकर परिवाराचा वतीने आकर्षक अश्या रांगोळी काढण्यात येवून पिण्याचा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती .

यावेळी पालखी सोहळ्याचे   मंदार शहाणे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर , बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले , माजी सचिव पोपटराव ढोकले , ॲड. सुप्रिया साकोरे ,

oplus_131074

माजी नगरसेविका ज्योति लोखंडे , रोहिणी बनकर , कविता वाटमारे , पुणे जिल्हा भाजपा अल्पसंख्याक अध्यक्ष राजूभाई शेख , चित्रपट निर्माते डॉ . संतोष पोटे , डॉ . सुनिता पोटे , गोरक्षनाथ दातखिळे ,शिवसेनेचे सुनील चौधरी ,माजी उपसरपंच गणेश खोले ,मुकेश वर्मा , सामाजिक कार्यकर्ते प्रीतेश फुलडाळे , किरण बनकर ,

हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक काळे ,  अविनाश जाधव , प्रसाद लांडे ,शरद परदेशी, रणजीत गायकवाड , श्याम परदेशी , सुनील जठार  ,  सिंकदर मण्यार , प्रणव मुसळे ,  गोपीनाथ पठारे , भागचंद पवार  , लखन डोके, बाळासाहेब पाचारणे , संतोष झांबर , सह मोठ्या संख्येने शिरुरकर उपस्थित होते .
अनेक शिरुरकर गव्हाणेवाडी पर्यत पालखी सोहळास निरोप देण्याकरीता  पायी गेले .साईबाबा पालखी सोहळा समितीच्या वतीने दरवर्षी गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त साई पालखीचे आयोजन करण्यात येते. गव्हाणेवाडी , ता . श्रीगोंदा , जि . अहिल्यानगर  येथील  साई पॅलेस येथे ही पालखीचे स्वागत करुन अल्पोहार देण्यात आला .
फोटो ओळी
साईबाबा पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण सतरा कमानीचा पुलाजवळ झाले. रिंगण सोहळानंतर पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यातून अहिल्या नगर जिल्ह्यात प्रवेश केला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button