Uncategorizedधार्मिंकविशेष

आषाढी एकादशी निमित्त शिरुर शहरात अभंगवाणी सह किर्तन , फराळ वाटप असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)अभंगाच्या भक्तिरसाने आषाढी एकादशीच्या दिवशी शिरूर येथील प्राचीन कुंभार समाजाच्या विठ्ठल मंदिरात साक्षात पंढरपूर अवतरले. निमित्त होते  गणेश मराठे संचालित ओंकार संगीत विद्यालयाच्या कलाकारांनी सादर केलेल्या ‘ तीर्थ विठ्ठल ‘या संगीतमय कार्यक्रमाचे.

गणेश मराठे यांनी गायलेल्या विष्णुमय जग या अभंगाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विठ्ठल आवडी प्रेमभावे , अबीर गुलाल, खेळ मांडियेला, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, माझे माहेर पंढरी, तुझे रूप चित्ती राहो अशी भक्ती गीते कलाकारांनी सादर केली. यामध्ये  गणेश मराठे, मोनाली जाधव, योग ताम्हाणे, डॉ. समीर ओंकार, डॉ. नूतन क्षीरसागर, सुषमा झावरे, गोपाल भावसार, शिल्पा घोडे, मानसी घोडके, हृदया क्षीरसागर, नितीन मामीडवार आदी कलाकार सहभागी झाले.  सखाराम पुरी व आरुष पाटील यांनी तबल्यावर साथ दिली. मानसी घोडके यांनी सूत्रसंचालन केले. गणेश मराठे यांनी गायलेल्या विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली . या वेळी गुरुवर्य तु. म. परदेशी, माजी मुख्याध्यापक व्ही. डी. कुलकर्णी, शिरूरचे  माजी उपनगराध्यक्ष संतोष कडेकर , संपत लोखंडे, रामदास शिर्के, , डॉ. आनंद क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थितीत होते. योगेश जामदार व अखिल कुंभार आळी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सहभागी सर्व कलाकारांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कलाकारांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या संगीतमय कार्यक्रमाने प्रेक्षकांना साक्षात पंढरपूरच समोर अवतरल्याची अनुभूती देत भक्तिरसात चिंब भिजविले.
आषाढी एकादशी निमित्त
श्री. संत शिरोमणी सावता महाराज समाजसेवा प्रतिष्ठाण ध्यान मंदीर व्यवस्थापन समिती, विठ्ठलनगर, शिरुर
यांच्या वतीने ह.भ.प. जनाबाई गायकवाड यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी आयोजित धार्मिक कार्यक्रमास सहआयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे संजीव पलांडे ,जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल , जिल्हा परिषद माजी सदस्या रेखा बांदल , माजी जिल्हा परिषद सदस्य  राहुल बाबुराव पाचर्णे, शेखर पाचुंदकर , रवि भुजबळ ,माजी सरपंच  विठ्ठल घावटे आदी उपस्थित असल्याची माहिती किरण बनकर यांनी दिली .
आषाढी एकादशी निमित्त  शिरूर शहरातील ओन्ली वूमन जीम व भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रिया बिरादार यांच्या वतीने शिरूर नगरपरिषद जवळील श्री.दत्त मंदिराजवळ श्री विठ्ठल रुक्मिणी यांची महाआरती करून शाबुदाणा खिचडी फराळ व केळींचे  वाटप करण्यात आले.
यावेळी ओन्ली वूमन जीमच्या संस्थापिका प्रिया बिरादार यांनी सांगितले की, “आषाढी एकादशी ही भक्ती, सेवाभाव आणि एकतेचे प्रतीक आहे. या दिवशी भाविकांची सेवा करण्याची संधी मिळणे हीच आमच्यासाठी खरे पुण्य आहे.”
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे,माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षिरसागर,शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे, सामाजिक कार्यकर्ते बापू सानप , शिवसेना महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सुजाता पाटील,समाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे,मनसे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा डॉ.वैशाली साखरे, मिरा नर्सिंग होमचे डॉ.संतोष पोटे,आदिशक्ती महिला मंडळाच्या शशिकला काळे, वात्सल्य सिंधू फाउंडेशन उषाताई वाखारे ,  अध्यात्मिक आघाडीचे प्रमोद जोशी, नीलमधू शर्मा , भाजपाच्या उपाध्यक्षा सुष्ट्री करंजुले विजयलक्ष्मी उपाध्याय, जयश्री हारदे ,कविता बोरगे, मीरा परदेशी ,सना शेख ,सुशीला गोसावी, हरीश शर्मा ,श्याम पाटील सुवर्णा चिपाडे, गणेश चिपाडे यांसह उपस्थितांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
यांवेळी  भाविक भक्तांनी मोठया संख्येने खिचडी फराळ महाप्रसादाचा लाभ घेतला.
उपस्थितांचे स्वागत ओन्ली वुमन जीम व भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रिया बिरादार यांनी  केले तर आभार शिवसेनेच्या सुजाता पाटील यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button