विशेष
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)—गेल्या अनेक वर्षापासूनचे शिरुर करांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण होण्याचा दृष्टीने पाउले पडू लागले असून पुणे-अहिल्यानगर शिरुर मार्गे रेल्वेमार्गाचा प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला आहे .
या प्रस्तावानुसार हा रेल्वेमार्ग पुणे-अहिल्यानगर महामार्गाला समांतर जाणार असून, मार्ग पूर्ण झाल्यानंतर नगर ते पुणे रेल्वे अंतरात तब्बल ३८ किलोमीटरने घट होणार आहे.
अखेर या मागणीची दखल घेत रेल्वे विभागाने सर्वेक्षण करून प्रकल्प अहवाल तयार केला आहे.
