Uncategorizedअपघातक्राईम

मोटार सायकलीस कुत्रे आडवे गेल्याने झालेल्या अपघातात युवकाचा मृत्य

शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)टाकळी हाजी, ता. शिरूर येथील
इंदिरा नगर येथे मोटार गॅरेज समोर झालेल्या दुर्दैवी अपघातात २२ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू झाला. हा अपघात  ९ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास झाला .
अपघातात  हितेश इंदल साहू  (वय २२ वर्षे, रा. नवगाव करंजीया, ता. व जि. बेमीतेरा, छत्तीसगड राज्य) मरण पावले . ते  बांधकाम मजुर म्हणून काम करत होते . त्याचे  सहकारी दिलीप रामकिसन निशाद (वय ३१ वर्षे, रा. टाकळी हाजी, मूळ रा. धनगाव, छत्तीसगड) याने याबाबत पोलीस स्टेशनला  खबर दिली आहे .
पोलीसांनी दिलेल्या  माहितीनुसार हितेश मोटारसायकलवरून जात असताना अचानक रस्त्यावर एक कुत्रा आल्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो जोरात रस्त्यावर पडला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. तातडीने वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्या त्याचा मृत्यू झाला.
या घटनेबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे अम रजि. क्र. ९१/२०२५, भा.दं.सं. १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून या अपघाताचा आधिक तपास  पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस हवालदार वारे करीत आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button