क्राईम

ऑनलाइन फसवणूक: शिरूरमधील व्यक्तीची एक लाख रुपयांची आर्थिक फसवणूक

शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम-24)
शिरूर येथील प्रितम प्रकाश नगर परिसरातील रहिवासी किशोर सावळेराम कवडे (वय 39 वर्षे, व्यवसाय-नोकरी) यांच्या बँक खात्यातून एकूण ₹1,00,000 इतकी रक्कम अज्ञात इसमाने ऑनलाईन मार्गाने फसवणूक करून काढून घेतल्याची घटना समोर आली आहे.
तक्रारदार श्री. कवडे हे दिनांक 8 जुलै 2025 रोजी सायंकाळी 8.10 वाजता आपल्या राहत्या घरी असताना, त्यांच्या परवानगीशिवाय व त्यांनी कोणतीही ओटीपी माहिती न देता Ref No – 518920147281 आणि 518920148817 या संदर्भ क्रमांकाच्या माध्यमातून त्यांच्या एचडीएफसी बँक (शाखा: शिरूर) खाते क्रमांक 22601140001890 मधून प्रत्येकी ₹50,000 असे एकूण ₹1 लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने काढून फसवणूक केली गेली आहे.
याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. 484/2025 भा.दं.सं. 118 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 66, 66(सी), 66(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून पो.स.ई. पवार यांनी गुन्हा नोंदवला आहे. संबंधित इसम अजूनही अज्ञात असून पोलीस तपास सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button