Uncategorizedक्राईम

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी  चैन स्नॅचिंग प्रकरणातील फरार आरोपीला अटक  करुन  एकूण ८ गुन्हे उघडकीस आणले .१० तोळे सोन्याचे दागिने सह एकूण १० लाख रु .चा माल जप्त.

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी  चैन स्नॅचिंग प्रकरणातील फरार आरोपीला अटक  करुन  एकूण ८ गुन्हे उघडकीस आणले आहेत .१० तोळे सोन्याचे दागिने, मोटारसायकल आणि अन्य मुद्देमाल असा एकूण ₹१० लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी शरद बापू पवार (वय २७, रा. लोणी सय्यद मिर, ता. आष्टी, जि. बीड) हा गुन्हा घडल्यानंतर फरार होता पोलीसांनी त्याला अटक केली आहे .
  याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार
२५ मार्च २०२५ रोजी सकाळी  पिंपरी दुमाला , ता. शिरुर येथील धनगरवाडा स्नॅक सेंटरसमोर उभ्या असलेल्या सौ. वंदना रोहीदास शेटे (वय ३३) यांच्या गळ्यातील ₹६०,०००/- किमतीचे ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी  गंठण दोन अज्ञात व्यक्तींनी मोटारसायकलवरून येत जबरदस्तीने हिसकावून चोरले होते. याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील प्रमुख आरोपी मारुती उर्फ गोविंद रामनाथ आंधळे (वय ३८, रा. लिंबोडी, ता. आष्टी, जि. बीड) यास ४ जून रोजी पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली अपाचे १६० आरटीआर मोटारसायकल (₹१ लाख किमतीची) जप्त करण्यात आली. त्याने चोरलेले दागिने आष्टी येथील एका सोनाराकडे विकल्याची कबुली दिल्यानंतर, त्या सोनाराकडून १० तोळे सोन्याचे दागिने (₹९ लाख किमतीचे) हस्तगत करण्यात आले.
या गुन्ह्यातील दुसरा आरोपी शरद बापू पवार (वय २७, रा. लोणी सय्यद मिर, ता. आष्टी, जि. बीड) हा गुन्हा घडल्यानंतर फरार होता. पोलीस नाईक योगेश गुंड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी नाशिक येथे नातेवाईकांकडे येणार असल्याचे समजल्यावर, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे व पो.ना. गुंड यांनी सापळा रचून त्याला ९ जुलै रोजी अटक केली.
आरोपींवर एकूण ८ गुन्हे
तपासात समोर आले  अटक आरोपीनी  याआधी
रांजणगाव एमआयडीसी पो.स्टे. – २
शिरूर पो.स्टे. – १
शिक्रापूर पो.स्टे. – १
आळंदी पो.स्टे. – १
चाकण पो.स्टे. – २
कर्जत पो.स्टे. (अहिल्यानगर) – १
असे एकूण ८ गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
हा तपाअ  पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, रांजणगाव एमआयडीसी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक फौजदार  दत्तात्रय शिंदे, पो.कॉ. योगेश गुंड, पो.कॉ. उमेश कुतवळ, पो.हवा. विलास आंबेकर, पो.कॉ. किशोर शिवणकर यांनी केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button