Uncategorizedविशेष

गृरुपौर्णिमेनिमित्त शिरूर येथे हजारो भाविकांनी घेतला पिठलं भाकरीचा प्रसाद.डेक्कन स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी केले आई वडिलांचे पाद्य पूजन .

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)गुरुपौर्णिमा निमित्त शिरूर मध्ये स्वामी समर्थ मंदिरासह विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . शाळांन मध्ये गुरुजनांचा गुरुपौर्णिमेनिमित्त सन्मान करण्यात आला
येथील प्रितम प्रकाश नगर मधील स्वामी समर्थ मंदिर येथे गुरुपौर्णिमा निमित्त महाआरती, महाप्रसाद, रक्तदान शिबीर, पालखी सोहळा, भजन या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवभरात शहर व पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी मंदिरामध्ये श्री. स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले.
स्वामी समर्थ सेवा संस्था व कामगार नामा ट्रस्ट यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ६५ नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदाते यांना भेटवस्तू, प्रमाणपत्र देण्यात आले.
स्वामींच्या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी सहभाग घेतला. यात महिला भाविकांची संख्या मोठी होती. यावेळी नामांकित ब्रास बँड तसेच श्री. स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ यांनी विविध धार्मिक गाणी यावरती जयघोष केला. पालखी सोहळ्याचे स्वागत नागरिकांनी विविध आकर्षक रांगोळी पायघड्या, फुलांच्या वर्षाव करून केले. पालखी सोहळा झाल्यानंतर महाआरती करण्यात आली.
मंदिरामध्ये दिवसभर आलेल्या भाविकांना प्रसादाचे वाटप व संध्याकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत भाकरी, पिठलं, लापशी याचा महाप्रसादचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. रात्री ९ ते ११ यावेळेत भजनाचा कार्यक्रम झाला.
संपूर्ण मंदिर परिसरावर रोषणाई करण्यात आली होती .
मंदिर परिसरात भाविकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे . मंदिर परिसरात ब्लॉक टाकण्यात आले असून भव्य अशी स्वागत कमान ही उभारण्यात आली आहे . मंदिर परिसरात भाविकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा मानस असून यासाठी भाविकांनी आर्थिक योगदान द्यावे असे आवाहन श्री .स्वामी समर्थ सेवा संस्था, शिरूरच्या वतीने करण्यात आले आहे .
सेवा संस्थेचे अध्यक्ष योगेश प्रकाश वाळकीकर , उपाध्यक्ष ॲड . नारायण सिताराम पवार ,सचिव दिपक रामचंद्र वर्मा , खजिनदार गणेश पोपटराव घाटगे , कार्यकारी सदस्य संपत बाळकृष्ण लोखंडे , सचिन रामदास गुंजाळ , चंद्रकांत भिमाजी निघोजकर , विष्णु नारायण वेताळ,, प्रभावती प्रमोद पवार , भूषण विजय कडेकर , मंगलाताई नविनचंद्र बागमार आहेत .

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून येथील डेक्कन स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी आई वडिलांचे पाद्य पूजन केले. आयुष्यभर आपल्या मुलांसाठी आतोनात कष्ट व त्याग करणाऱ्या आई वडिलांचे पाद्य पूजन करताना सर्वच विद्यार्थी भावूक झाले होते. पालकांच्या डोळ्यातही नकळत आनंदाश्रु तरळत होते. या प्रसंगी व्यासपीठावर अहिल्यानगर येथील निवृत्त प्राध्यापिका सौ. नलिनी पाचर्णे व शिरूर येथील स्वाध्याय परिवाराच्या सौ. रत्नमाला झावरे , मुख्याध्यापक डॉ. समीर ओंकार, शिक्षक प्रतिनिधी जयश्री दांडगे, पालक प्रतिनिधी अक्षय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. ओंकार यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शिक्षिका सौ. प्रिया नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलानी नृत्य व नाटिका सादर केली. स्वरूप बारी या विद्यार्थ्याने भजन सादर केले. यश दिवेकर या विद्यार्थ्याने तबल्यावर साथ केली. आरुष पाटील या विद्यार्थ्याने कविता सादर केली. प्रा. पाचर्णे यांनी आयुष्यात संस्कारांचे महत्व विषद केले. तसेच आई वडिलांची सेवा म्हणजेच गुरूची सेवा असल्याचे नमूद केले. श्री. सखाराम पुरी यांनी गुरुपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले. शाळेतील शिक्षिका सौ. मोनाली जाधव, अमोल वाघमारे, शीतल ढवळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. अर्पिता सातव हिने सूत्रसंचालन केले. जयश्री दांडगे यांनी आभार मानले.

बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल व बालाजी किड्स वर्ड स्कूल हे नेहमीच विद्यार्थ्यांना मौलिक ज्ञान देते. विद्यार्थ्यांनी सुसंस्कृत घडावे या दृष्टीने शाळा नेहमीच कार्यरत असते. यासाठी विविध सण साजरी करणे व यातून नैतिक मूल्यांची जपणूक करणे शिकवले जाते.
गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेने पालक व शिक्षक यांचे पूजन विद्यार्थ्यांकडून करून घेतले. यशस्वी व संस्कृत होण्यासाठी आपल्या शिक्षकांचे व पालकांचे महत्वाचे योगदान असते हे मुलांना पटवून दिले.
कार्यक्रमाची सुरुवात ही महर्षी वेदव्यास यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. ज्यांनी आपल्याला वेद आणि महाभारताची देणगी दिली. त्यांचे प्रथम पूजन करण्यात आले. यानंतर प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या जेष्ठ नागरिक सौ. निर्मला दादासाहेब बोत्रे व पालक वर्ग यांचे प्राचार्य मनमित चौरे, उपप्राचार्य प्रणिता शेळके आणि बालाजी किड्स वर्ल्ड स्कूलच्या प्राचार्य शितल बांदल यांनी स्वागत केले.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रथम गुरू हे पालक आपल्या आयुष्यात किती महत्वाचे असतात, तर चांगले शिक्षक लाभणे किती महत्वाचे आहे हे सांगितले.
संगीत शिक्षक साईनाथ टाळे यांनी गुरुपर स्तोत्र पठण केले. विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली व आपल्या शिक्षकांचे आणि पालकांचे पूजन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नीलम चौरे यांनी केले.

शिरुर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल स्वाती प्रकाश थोरात यांचे डेली न्यूज पोस्ट -२४ चा वतीने हार्दिक अभिनंद्न
खेळाडू व शिक्षिका अनिता भोगावडे यांना डेली न्यूज पोस्ट -२४ चा वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button