शिरूर दिनांक, (डेली न्यूज पोस्ट टीम – 24 ) संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा शिरूर येथील विविध संस्था व सामाजिक संघटनांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत
हल्लेखोरांवर कारवाई करावी अशी मागणी शिरूर तहसील कार्यालयात तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक,अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा सरचिटणीस भास्कर पुंड अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर,माजी उपसरपंच संभाजी कर्डिले, संजय बांडे ,
शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र जाधवराव,घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे संभाजी ब्रिगेडचे सुदाम कोलते, सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डिले, रूपाली बोर्डे,राधा घेगडे, समस्त सकल मराठा समाज संघाचे विश्वस्त रामभाऊ इंगळे,संभाजी ब्रिगेडचे चंद्रशेखर वाखारे, प्रा. चंद्रकांत धापटे माजी नगरसेवक विनोद भालेराव काँग्रेस आय चे अजीम सय्यद,माजी नगरसेवक मंगेश खांडरे,मोहम्मद हुसेन पटेल, बबनराव गायकवाड,यासह विविध संस्था संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

असे निवेदनात म्हटले असून हल्ल्याच्या सूत्रधार अद्याप मोकाट आहे.या हल्लेखोरांवर कडक कारवाई कारवाई करावी.
