अज्ञात चोरट्याने केलेल्या घरफोडीत रोख रक्कम, सोन्याचे दागिने व दुचाकी असा अडीच लाख रु ऐवज केला लंपास
शिरूर (डेली न्यूज पोस्ट-24):
तळईमाळ वडगाव रासाई ता शिरुर अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश करून रोख रक्कम, सोन्याचे दागिने व दुचाकी असा एकूण अडीच लाख रु . चा ऐवज लंपास केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार
या प्रकरणी प्रसाद दिगंबर ढवळे (वय 22, व्यवसाय शेती व हॉटेल, रा. तळईमाळ वडगाव रासाई, शिरूर) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे .
,दिनांक 12 जुलै 2025 रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 4 वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने ढवळे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील ₹55,000 रोख रक्कम, अंदाजे ₹1,50,000 किंमतीचे 2.5 तोळ्यांचे सोन्याचे गंठण, तसेच होंडा सीडी – 110 ड्रीम डीलक्स (एम . एच . -१२ एक्स आर 6635) ही दुचाकी चोरुन नेली .
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गु. र. नं. 497/2025, भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305, 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शना खाली पो.स.ई. नकाते करत आहे .