पिकअप व मोटारसायकल अपघातात दोन जणांचा मृत्यु


संदीप रोहीदास मदने हा त्याच्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल नं एम. एच 12 एन. एस 2796 या वरून नागरगाव वरून निघुन आंधळगाव फाटा येथुन त्याचा सहकारी विक्रम महादेव सकट यास मोटार सायकलवर पाठीमागे बसवुन ते दोघे मोटार सायकलवरून एस.व्ही. एस कंपनी करडे येथे चौफुला- शिरुर रोडने कामास जात असताना रंगनाथ साळुखे यांचे घरासमोर गेल्यावर शिरूर बाजुकडुन समोरून पिकअप गाडी वरील
चालक दत्तात्रय रामचंद्र कदम वय 32 वर्ष रा. रामलिंग ता. शिरूर , जि. पुणे याने त्याच्या ताब्यातील पिकअप गाडी नं एम. एच. 12. एस. एक्स 4835 ही अविचाराने, हयगयीने रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजी पणे चालविल्यामुळे चौफुला बाजुकडुन शिरूर बाजू कडे चाललेल्या हिरो होंडा मोटार सायकल नं एम. एच 12 एन. एस 2796 ही स पिकअप गाडी वरील चालकाने मोटार सायकलच्या विरूध्द दिशेस जावुन समोरून त्यांचे मोटार सायकलला धडक दिली . या अपघातात संदीप मदने व विक्रम सकट गंभीर जखमी होवून मरण पावले .अपघाताचा आधिक तपास पोलीस संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कदम करीत आहेत .
