क्राईमराष्ट्रीय

चार बांगलादेशी नागरिकांचा विरोधात बेकायदा वास्तव्य केल्या संदर्भात गुन्हा दाखल

Φè
शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24 )
कारेगाव , ता शिरुर येथे घुसखोरीच्या मार्गाने भारतीय सरहद्दीत प्रवेश करून बनावट भारताचे आधार कार्ड धारण करून अनाधिकृतपणे कारेगाव येथे मागील दोन वर्षापासून वास्तव्य करत असलेल्या चार बांगलादेशी नागरिकांचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे .
यासंदर्भात भा .न्या स .का कलम – 336(2)(3),338,340(2)
पासपोर्ट अधिनियम कलम 3,6
पारपत्र अधिनियम 1950 कलम 3(a)
परकीय नागरिक आदेश 1948 कलम 14 नुसार 1) कमरोल रमजान शेख वय 32 ,गाव दामोदर ठाणा फुलताला जिल्हा खोलना,बांगलादेश 2) अकलस मजेद शेख वय 39 धर्म मुस्लिम गाव उसला ठाणा पोटालीपाडा, जिल्हा गोपालगंज,बांगलादेश 3) मोहम्मद अब्दुल्ला मलिक वय 35 धर्म मुस्लिम गाव मादपपाशा तालुका कालिया जिल्हा नोडाइल,बांगलादेश 4) जाहिद अबूबकर शेख वय 30 धर्म मुस्लिम गाव पिडोली तालुका कालिया जिल्हा नोडाइल,बांगलादेश. वरील सर्व सध्या राहणार कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे. यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मोसिन बशीर शेख पो. कॉ. बक्कल नंबर 29 68 दहशतवाद विरोधी शाखा पुणे ग्रामीण यांनी फिर्याद दिली आहे .
११ जुलै २०२५ रोजी कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे कमरोल रमजान शेख वय 32 , गाव दामोदर ठाणा फुलताला जिल्हा खोलना बांगलादेश 2) अकलस मजेत शेख वय 39   गाव उसला ठाणा पोटालीपाडा, जिल्हा गोपालगंज,बांगलादेश 3) मोहम्मद अब्दुल्ला मलिक वय 35 धर्म मुस्लिम गाव मादपपाशा तालुका कालिया जिल्हा नोडाइल  बांगलादेश 4) जाहिद अबूबकर शेख वय 30    पिडोली तालुका कालिया जिल्हा नोडाइल बांगलादेश हे सर्व कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रा शिवाय किंवा भारत सरकारने अथवा भारतीय सीमेवरील नोंदणी अधिकारी यांनी नेमून दिलेल्या मार्ग व्यतिरिक्त घुसखोरीच्या मार्गाने भारतीय सरहद्दीत प्रवेश करून बनावट भारतीय देशाचे आधार कार्ड धारण करून अनाधिकृतपणे कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे महाराष्ट्र येथे मागील दोन वर्षापासून वास्तव्य करत असलेले आढळून आले.
सदर गुन्हा मध्ये गोपनीय माहितीच्या आधारे दहशतवाद विरोधी शाखा, पुणे ग्रामीण यांच्याकडील पोलीस अंमलदार मोसीन शेख यांना गोपनीय बातमीदारात मार्फत माहिती मिळाली होती की कारेगाव, तालुका शिरूर येथे काही बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्य करत आहेत . या बातमीच्या अनुषंगाने दहशतवाद विरोधी शाखा, पुणे ग्रामीण व रांजणगाव पोलिसांनी केलेल्या संयुक्तपणे छापा टाकून केलेल्या कारवाईमध्ये वरील चार बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्य करताना मिळून आले .
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल , अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे , पोलीस उपविभागीय आधिकारी प्रशांत ढोले , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व दहशतवाद विरोधी शाखेचे प्रकाश पवार, , त्याचप्रमाण दहशतवाद विरोधी शाखा पुणे ग्रामीण व रांजणगाव पोलीस स्टेशन कडील पीएसआय अविनाश थोरात, विशाल गव्हाणे, दत्तात्रय शिंदे,
विशाल भोरडे, रवींद्र जाधव, पोलीस कॉन्स्टेबल मोसीन शेख, ओमकार शिंदे, योगेश गुंड, संतोष साळुंखे, आकाश सवाने यांचे पथकाने केली .

शिरुर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल स्वाती प्रकाश थोरात यांना डेली न्यूज पोस्ट -२४ चा वतीने हार्दिक शुभेच्छा .
खेळाडू व शिक्षिका अनिता भोगावडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button