धार्मिंकविशेष

गणराया ॲवार्ड 2024 चे प्रथम क्रमांक चे बक्षीस हलवाई चौक गणेश मित्र मंडळ हलवाई चौक शिरूर यांना

शिरूर दिनांक (डेली न्यूज पोस्ट टीम -24)
शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत गणराया ॲवार्ड 2024 चे प्रथम क्रमांक चे बक्षीस हलवाई चौक गणेश मित्र मंडळ हलवाई चौक शिरूर यांना जाहीर झाले असून पोलीस उप अधीक्षक प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते हे बक्षिस देण्यात आले .
येथील पंचायत समितीचा सभागृहात
झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी हे बक्षिस देण्यात आले.
शिरुर परिसरात सन २०२४ या वर्षी झालेल्या गणेशोत्सवात गणेश मंडळानी सादर केलेले देखावे , राबवित असलेले विविध उपक्रम व विसर्जन मिरवणूक या निकषादवारे गणेश मंडळाचे परीक्षण करण्यात आले .
त्यानुसार प्रथम क्रमांक – हलवाई चौक गणेश मित्र मंडळ हलवाई चौक ,द्वितीय क्रमांक -डंबेनाला गणेश मित्र मंडळ, यशवंतराव चव्हाण चौक शिरुर , तृतीय क्रमांक – कापड बाजार मित्र मंडळ कापड बाजार
उत्तेजनार्थ क्रमांक – छत्रपती संभाजी गणेश मित्रमंडळ , व सुवर्णय्गचा राजा मित्र मंडळ संभाजीनगर ( हुडको कॉलनी ), हनुमान गणेश मित्र मंडळ मारुती आळी, अजिंक्यतारा गणेश मित्र मंडळ,मुंबई बाजार. यांचा आला
यावेळी बोलताना पोलीस उपाधीक्षक ढोले म्हणाले की सन 2024 मध्ये विविध उपक्रम राबवणाऱ्या गणेश मंडळांना गणराया अवार्ड बक्षीसाने सन्मानित करण्यात आले आहे .गणेश मंडळांनी पर्यावरण पूरक असे देखावे सादर करावे .त्याचबरोबर समाजामध्ये विधायक व चांगला संदेश जाईल असे विविध उपक्रम व देखावे सादर करावेत. शिरूर मध्ये नागरिकांचे पोलीस प्रशासनास चांगले सहकार्य लाभते असे ही त्यांनी आवर्जून सांगितले. गणेशोत्सव पारंपारिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी डी.जे .मुक्त गणेश उत्सव शहरात साजरा करावा असे आवाहन करून पारंपारिक वाद्य गणेशोत्सवात वाजवावी असे सांगितले.
गणराया अवॉर्ड चे परीक्षण प्रा. चंद्रकांत धापटे, प्रा. विलास आंबेकर . डॉ. रविन बोरा ॲड. सुप्रिया साकोरे व प्रा . सतिश धुमाळ यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आम्ही शिरुरकर फाउंडैंशनचे अध्यक्ष रवींद्र सानप यांनी केले. सुत्रसंचालन प्रा .सतिश धुमाळ यांनी केले तर आभार पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके यांनी
मानले .
यावेळी जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष संजय बारवकर,वात्सल्य सिंधू फाउंडेशनच्या उषा वाखारे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, आधार छाया फाउंडेशनच्या सविता बोरुडे,ॲक्टिव्ह सोशल गृपच्या कामिनी बाफना, सामाजिक कार्यकर्ते नितीन थोरात,नीलेश संघवी ,प्रशांत भोसले ,अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे, बाळासाहेब झाडगे, अशोक काळे,प्रसाद लांडे आशिष दुगड, मितेश गादिया, शैलेश जाधव, अजिंक्य तारू,अमोल गारुडी, शुभम पुजारी, वाहतूक पोलीस वाघमोडे , सिंकदर मण्यार , रणजित गायकवाड , अविनाश जाधव , श्याम परदेशी ,  मुकुंद ढोबळे आदी उपस्थित होते.
सन -२०२४ चे गणराया ॲवार्ड प्रथम क्रमांक प्रप्त केलेले हलवाई चौक गणेश मित्र मंडळ सातत्याने विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमाचे आयोजन करतात . मंडळाने काही वर्षापूर्वी विसर्जन मिरवणुक साध्या पध्द्तीने काढून त्यातून वाचलेल्या पैसातुन परिसरात सी. सी. टी .व्ही कॅमेरे बसविलेले आहेत . त्याखेरीज मंडळाच्या उत्सव मंडप खड्डे विरहित असा आहे . शहरात मंडळाच्या वतीने महिलांसाठी सामुहिक महिला आरती सर्व प्रथम सुरु करण्यात आली .त्याखेरीज पर्यावरण संरक्षण ,निसर्ग वाचवा झाडे लावा झाडे जगवा या मोहिमे अंतर्गत गणेशोत्सव काळात महिला आरतीला महिलाना तुलसीच्या रोपासह देशी झाडांची रोपे भेट दिली जातात . वाचन संस्कृती वाढविण्यासाठी परिसरातील विद्यार्थ्याना पुस्तके वाटण्यात येतात .गणेशोत्सव काळात महत्वाची भुमिका बजाविणारे पोलीस बांधव व नगरपरिषद स्वच्छता विभागातील कर्मचारी यांच्या विशेष सन्मान कृतज्ञता सोहळ्या दवारे मंडळाच्या वतीने केला जातो. त्याच बरोबर आरोग्यशिबीराचे ही आयोजन केले जाते आरोग्यपर जनजागृती व प्रबोधनाचे ही कार्यक्रम घेतले जाते . शहरात गणेश जयंती निमित्त महाप्रसाद ही मंडळाचा वतीने सुरु करण्यात आला .
स्वच्छता अभियानातही मंडळाचा सक्रीय सहभाग असतो . गरजू विद्यार्थ्याना शालेय साहित्य व ड्रेसेस ही देण्यात येतात .
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या शिक्षकांना ‘ प्रेरणादायी शिक्षक ‘पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात येते . आता पर्यत २५ हून आधीक शिक्षकाना सन्मनित करण्यात आले आहे .
कोरोनोच्या काळात शहरातील गरजूना अन्नधान्यचे कीट, सांगली व महाड परिसरातील पूरग्रस्ताना अन्न धान्य व अन्य वस्तूंची मदत मंडळाच्या वतीने देण्यात आलेली आहे .
लोकवर्गणीतुन हलवाई गणेशास चांदीचे आभूषणे करण्यात आली आहे . श्री. गणेश जयंतीस हजारोंच्या संख्येने महाप्रसादासाठी भाविक हलवाई गणेश येथे येत असतात .
दरवर्षी पौराणिक ,धार्मिक ,अथवा सामाजिक विषयांवरील देखावे सादर करण्याची मंडळाची परंपरा असून सर्वधर्मीय नागरीक मोठया संख्येने मंडळात कार्यरत आहे .
पुणे ग्रामीण पोलीस यांच्या वतीने मंडळाच्या कार्याची दखल घेवुन मंडळास बक्षिस देवुन सन्मानित करण्यात आलेले आहे .१५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दिवशी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झेंडावंदन व मुलांना खाउवाटप ही केले जाते .
त्याच बरोबर विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ही कार्यक्रमाचे आयोजन केले जाते .
यंदा मंडळाचा उत्सवाचे ५० वर्ष असून या वर्षात मंडळास प्रथम क्रमांकाचे गणराया ॲवार्ड जाहीर झाल्यावर कार्यकर्त्यानी पेढे व लाडू वाटून आनंद साजरा केला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button