Uncategorizedराष्ट्रीयविशेष
बाबूराव दौंडकर स्मारक समितीचा वतीने महावीर कि रोटी ,पाणीदार टीम कान्हूर मेसाई, ग्रामविकास फाउंडैशन कोंढापुरी , कांतीलाल नलगे , सुरेंद्र महाराज देव , नूतन नळकांडे यांना पुरस्कार जाहिर

शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट -24)बाबूराव दौंडकर स्मारक समितीचा वतीने विविध क्षेत्रात निरपेक्ष भावनेने काम करणारा संस्था व व्यक्तीना पुरस्कार जाहिर करण्यात आले आहे .
याबाबत माहिती देताना स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड. धर्मेंद्र खांडरे यांनी सांगितले की विविध क्षेत्रात निरपेक्षपणे काम करुन समाजाची सेवा करीत आहे त्याची दखल घेवून व त्याच्यापासून प्रेरणा इतर घटकांनी देखील काम करावे या उद्देशाने बाबूराव दौंडकर स्मारक समितीचा वतीने कृषी , पर्यावरण , जल व्यवस्थापन , सेवा , गोसेवा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारा व्यक्ती व संस्था यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.


यावेळी तालुक्यातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन शिरुर तालुक्याच्या भल्याकरीता काम करणा-या पुरस्कार्थांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष ॲड. श्री धर्मेद्र खांडरे यांनी केले आहे .यावेळी समितीचे कोषाध्यक्ष सागरनाना फराटे उपस्थित होते .