शिरूर दिनांक (डेली न्यूज पोस्ट टीम-24)करेगाव तालुका शिरूर येथे पोहण्या साठी पाण्यात उतरलेल्या दोन मुलांच्या बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.तर दोन जणांवर उपचार सुरु आहेत.
अनमोल उर्फ बाबु प्रविण पवार वय 13 वर्षे व त्याचा मित्र कुष्णा उमाजी राखे वय 8 वर्षे दोन्ही रा. कोहकडे हॉस्पीटल शेजारी कारेगाव,ता. शिरूर जि. पुणे अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी प्रदिप रामराव पवार वय 32 धंदा नोकरी रा. एस. इन चौक कारेगाव ता शिरूर जि पुणे यांनी याबाबत खबर दिली आहे
ही घटना 28 जुलैला कारेगाव जवळील बाभुळसर शिवलगत असलेले शेत तळ्यामध्ये घडली.

प्रविण रामराव पवार याचे दोन्ही मुले आदेश प्रविण पवार वय 14 व अनमोल उर्फ बाबु प्रविण पवार वय 13 तसेच त्यांचे मित्र कुष्णा उमाजी राखे वय 8 वर्षे रा. कोहकडे हॉस्पीटल शेजारी कारेगाव, स्वराज गौतम शिरसाठ वय 13 वर्षे रा. अनघा हाईटस, कोहकडे हॉस्पीटल मागे कारेगाव असे चौघे जण 28 जुलैला सायंकाळी
कारेगाव हददीतील बाभुळसर शिवलगत असलेले शेत तळ्यामध्ये पोहण्यासाठी गेले होते व त्यातील अनमोल उर्फ बाबु प्रविण पवार वय 13 व त्याचा मित्र कुष्णा उमाजी राखे वय 8 वर्षे असे पाण्यात बुडाले. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते व त्यानंतर शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे ते मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.

इतर दोन मुलांनवर उपचार सुरू आहेत. यासंदर्भात अधिक तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आगलावे करीत आहेत.