विशेष

पाण्यात बुडून दोन मुलांच्या मृत्यूने शोककळा

शिरूर दिनांक (डेली न्यूज पोस्ट टीम -24)
कारेगाव ता. शिरूर येथे पोहण्या साठी पाण्यात उतरलेल्या दोन मुलांच्या बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.तर दोन जणांवर उपचार सुरु आहेत.
अनमोल उर्फ बाबु प्रविण पवार वय 13 वर्षे व त्याचा मित्र कृष्णा उमाजी राखे वय 8 वर्षे दोन्ही रा. कोहकडे हॉस्पीटल शेजारी कारेगाव,ता. शिरूर जि. पुणे अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी प्रदिप रामराव पवार वय 32 धंदा नोकरी रा. एस. इन चौक कारेगाव ता शिरूर जि पुणे यांनी याबाबत खबर दिली आहे
ही घटना 28 जुलैला कारेगाव जवळील बाभुळसर शिवलगत असलेले शेत तळ्यामध्ये घडली.
प्रविण रामराव पवार याचे दोन्ही मुले आदेश प्रविण पवार वय 14 व अनमोल उर्फ बाबु प्रविण पवार वय 13 तसेच त्यांचे मित्र कुष्णा उमाजी राखे वय 8 वर्षे रा. कोहकडे हॉस्पीटल शेजारी कारेगाव, स्वराज गौतम शिरसाठ वय 13 वर्षे रा. अनघा हाईटस, कोहकडे हॉस्पीटल मागे कारेगाव असे चौघे जण 28 जुलैला सायंकाळी कारेगाव हददीतील बाभुळसर शिवलगत असलेले शेत तळ्यामध्ये पोहण्यासाठी गेले होते.

संतोष झांबर यांना वाढदिवसाच्या डेली न्यूज पोस्ट टीम-24 च्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

पाण्यात बुडू लागल्या वर मुलांनी आरडाओराड केल्यावर त्याठीकाणी क्रिकेट  खेळणारे ऋषिकेश नवले व दीपक राठोड यांनी पाण्यात उड्या मारून या मुलांना बाहेर काढले.त्यानंतर
दादा गवारे यांच्या गाडीतून गिरीश वालमपल्ले व गणेश देशमुख यांनी दवाखान्यात या मुलांना नेले.सलमान शेख, धनंजय गावडे,स्वप्निल नवले, दीपक राठोड,किरण चव्हाण, नाना सोनवणे महेश पोटघन व सर्व क्रिकेट टीमने इमर्जन्सी मदत केली त्यामुळे दोन मुलांचा जीव वाचवण्यास मदत झाली. परंतु दुर्दैवाने
त्यातील अनमोल उर्फ बाबु प्रविण पवार वय 13 व त्याचा मित्र कृष्णा उमाजी राखे वय 8 वर्षे असे पाण्यात बुडून मरण पावले.
इतर दोन मुलांनवर उपचार सुरू आहेत. यासंदर्भात अधिक तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आगलावे करीत आहेत.
प्रवीण पवार हे यवतमाळ येथील असुन काही वर्षांपूर्वी कामानिमित्त कारेगाव एमआयडीसीत ते आले. कंपनी ते काम करतात. त्यांना आदेश व अनमोल अशी दोन मुले होती. या दुर्घटनेत अनमोल यांचा मृत्यू झाला. तर उमाजी राखे हे मूळ चे नांदेड असून रोजगारनिमित्त ते कारेगाव परिसरात आले. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असुन या दुर्घटनेत त्यांचा कृष्णा नावाचा 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.
यादोन्ही मृत मुलांवार कारेगाव येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button