Uncategorizedक्राईम

महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या दोघा चोरट्यांचा शोध सुरू

शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -24):
शिरूर शहरातील ओयासीस परिसरात भरदुपारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून दोघा अनोळखी चोरट्यांनी पळ काढल्याची घटना शनिवारी (दि. २ ऑगस्ट) दुपारी घडली. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी छाया आनंद सातारकर (वय ६५, रा. ओयासीस कॉलनी, रामलिंग रोड, शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुपारी १२.४५ च्या सुमारास त्या फुले तोडत असताना काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटारसायकलवरून आलेल्या अंदाजे ३०-३५ वयाच्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना एक पत्ता विचारला.त्यानंतर मोटारसायकल फिरवून ते पुन्हा परत आले आणि त्यातील पाठीमागे बसलेल्या इसमाने जबरदस्तीने गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाचे, अंदाजे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून मोटारसायकलवरून पळ काढला.

घटनेनंतर फिर्यादींनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी पाठीमागे बसलेला इसम पांढरा शर्ट, काळी पँट, पांढरे स्पोर्ट शूज आणि निळ्या रंगाची टोपी घातलेला होता.

या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ५६०/२०२५, बी.एन.एस. कलम ३०४(२), ३(५) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक चव्हाण करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button