Uncategorizedविशेषशैक्षणिक

जागतिक वाणिज्य दिनानिमित्त चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात पोस्टर सादरीकरण स्पर्धा

शिरूर, ( डेली न्यूज पोस्ट टीम -24):
शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक वाणिज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने वाणिज्य विभागातर्फे पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.स्पर्धेचे उद्घाटन उपप्राचार्य प्रा. एच. एस. जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. विभाग प्रमुख डॉ. रेणुका करपे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करत उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी प्रा. वनवे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक, वाणिज्य विभागातील प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 “वाणिज्य हा विषय केवळ व्यवहारापुरता मर्यादित नसून तो सामाजिक व राष्ट्रीय विकासाचा आधारस्तंभ आहे. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, विश्लेषण क्षमता आणि जागतिक दृष्टिकोन विकसित होतो,” असे प्रतिपादन प्रा. जाधव यांनी केले.

या स्पर्धेत ७६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत ३८ पोस्टर्स सादर केली. आर्थिक धोरणे, आधुनिक व्यापार व्यवस्था, डिजिटल व्यवहार, CSR, ESG अशा विविध समकालीन विषयांवर विद्यार्थ्यांनी पोस्टर्सद्वारे विचार मांडले.

मातोश्री सुमनबाई बाळासाहेब करळे यांना डेली न्यूज पोस्ट टीम -24च्या वतीने विनम्र अभिवादन

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन वाणिज्य विभागातील प्राध्यापकांनी केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानवर्धनाबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास साधला जात असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button