निधन वृत्तमहाराष्ट्र
मंगला अरुणराव पवार (आंबेकर) यांचे निधन

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24 ) राहुरी , जि.अहिल्यानगर येथील मंगला अरुणराव पवार वय -७१ यांचे निधन झाले .
त्याच्या पश्चात पती , एक विवाहित मुलगी , मुलगा , सून नातवंडे , तीन बंधू असा परीवार आहे .
मंगला पवार यांचा परिसरातील धार्मिक सामाजिक कार्यात सहभाग असायचा . त्यांनी बोरा महाविद्यायलातून बी .ए .ची पदवी प्राप्त केली होती . राहुरी कृषि विद्यापीठातील सेवानिवृत्त प्रा. डॉ . अरुणराव पवार यांच्या त्या पत्नी होत . तर ॲड . महेश पवार व अमृता मगर यांच्या त्या मातोश्री होत .
शिरुर येथील प्रगतीशील शेतकरी विकास आंबेकर , पुणे जिल्हा भारतीय कृषक समाजाचे अध्यक्ष प्रा .विलास आंबेकर , शिरुर शहर कॉग्रेस आयचे शहराध्यक्ष नोटरी किरण आंबेकर यांच्या त्या भगिनी होत्या .
दशक्रिया विधी मंगळवार दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी राहुरी , जि. अहिल्यानगर येथे होणार आहे .
