विशेष
Related Articles
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24)शिरूर शहरासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईविरोधात भाजप महिला आघाडी आक्रमक झाली आहे. चुकीचा व अपूर्ण प्रस्ताव सादर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच दुरुस्त व परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करावा,
अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा दि. ४ मे २०२६ पासून बेमुदत उपोषण आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उलट वरिष्ठांकडे चुकीचा प्रस्ताव पाठवण्यात आल्यामुळे ही बाब अधिक गंभीर बनली आहे.







