विशेष

संपदा पतसंस्थेचे पुढील वर्षी स्वमालकीच्या जागेत स्थलांतर होणार.

पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रा. राजेराम घावटे यांची घोषणा

oplus_131074

शिरूर दिनांक { डेली न्यूज पोस्ट टीम 24)- संपदा नागरी पतसंस्था २५ व्या वर्षी स्वमालकीच्या बोरा कॉलेज रोड वरील रस्त्यावर होणार असुन यंदाचा वर्षी ८% लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती संपदा नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेराम घावटे यांनी दिली.
संपदा पतसंस्थेची वार्षिक २४ वी सर्वसाधारण सभा मार्व्हलीन हॉल येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा निबंधक यशदा राजीव नंदकर संस्थेचे संस्थापक प्रभाकर डेरे, उपाध्यक्ष अमित गव्हाणे, संचालक माधव गोरडे, सदाशिव पाबळे, रामदास पाचंगे, पांडुरंग कारखिले, इंद्रभान गायकवाड, आबा ठोंबरे, लिलाबाई थोरात, सुनीता गोर्डे मुख्य कार्यकारी अधिकारी संपत वाळुंज,दादाभाऊ कौठकर, माऊली गव्हाणे, कायदेशीर सल्लागार रवींद्र खांडरे, अतुल कुलथे, देवल शहा, ॲड .सोंडेकर, ॲड . अजित शेरकर, देवल शहा, बाळासाहेब बोरकर किरण डोंमे, नवनाथ पाचर्णे ,बाबासाहेब ठोंबरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना घावटे यांनी सांगितले की संस्थेच्या १५ शाखा आहेत. संस्थेचा ठेवी १०० कोटीहून अधिक असून कर्ज वाटप ७० कोटी रु चे आहे. संपदाचे काम वेगाने पुढे नेण्यात येईल.लोकांच्या
संपदा पतसंस्थेवर विश्वास असून संस्था प्रगतीपथावर आहे . संस्थेचे खर्च कमी करण्यासाठी सूचना केल्या आहेत .येणा-या काळात ठेवीत व कर्जवाटपात वाढ झाली पाहिजे. शिरूर शाखा २५ व्या वर्षात स्वमालकीच्या जागेत स्थळातरित करण्यात येणार असून नाबार्डच्या सहकार्याने शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा विचार आहे. घर कर्ज, वाहन कर्ज सुलभ करण्यात येणार आहे.१ कोटी ७ लाख नफा झाला आहे. व ८% लाभांश देण्यात येणार आहे. कर्मचारांची कार्यक्षमता वाढी साठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा यशदा चे निबंधक राजीव नंदकर म्हणाले की
आपले काम लोकाभिमुख कसे होईल व इतर आनंदी कसे होतील हे पाहणे गरजेचे आहे. काम करताना तुमच्या पदाला किती न्याय देता हे महत्वाचे.
तुमच्या जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार काम करा. आपण नेहमी वरच्या दिशेने काम करा व काम करताना सकारात्मक रीतीने काम करा.
विविध कौशल्ये आत्मसात करा म्हणजे तुमची अधिक प्रगती होईल.
ज्ञान, कौशल्य व पैसा हे पुढे जाण्यासाठी महत्वाचे आहे.
संस्था माणसाना मोठी करते तसेच माणसं ही संस्था मोठी करते . बँकेच्या कर्मचारी बहिर्मुखी असला पाहिजे.
आपली शरीरसंपदा जपा ती अनमौल्य अशी आहे. संयम ठेवायला शिका.
चुकीच्या सवयीचा त्याग करून चांगला सवयी अंगी बाळगा. आपले आयुष्य घडविण्यात आपण महत्वाचे आहे. ज्ञानाचा अभाव भीती निर्माण करते.नवनवीन कौशल्ये आत्मसात करा. प्राधान्यक्रम ठरवून वेळेचे व्यवस्थापन करता आले पाहिजे.
उपस्थितांचे स्वागत उप व्यवस्थापक सुभाष औटी  व तुकाराम काळे यांनी केले. प्रस्ताविक व अहवाल वाचन व्यवस्थापक संपतराव वाळुंज यांनी केले.आभार वृषाली दाते यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button