विशेष

विसर्जन मार्गांवर महत्वाचा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक : उपअधीक्षक प्रशांत ढोले

विसर्जन मार्गाची पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले, मुख्याधिकारी प्रीतम पाटील व वीज वितरण कंपनीचे अभियंता बारवकर व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसह संयुक्त पाहणी

विसर्जन मार्गाची पाहणी करताना पोलीस व शिरूर नगरपरिषद व वीज वितरण कंपनीचे अधिकारी

शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)विसर्जन मार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असणे आवश्यक असून काही ठिकाणी शिरूर नगर परिषदेने सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत यासह विसर्जन मार्गावरील रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांची दुरुस्ती करावी अश्या सूचना पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले यांनी दिल्या.

  • शिरूर शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गाची पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे व शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील, नगरपालिका अधिकारी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अभियंता बारवकर यांनी गणेश मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या समवेत संयुक्त पाहणी केली.

    शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस नगरपालिका व वीज वितरण कंपनी यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी विसर्जन मार्गावरील मारुती आळी येथून विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यास सुरुवात केली.

    सरदार पेठ, हलवाई चौक, सुभाष चौक, सोनार आळी, कुंभार आळी, मुंबई बाजार, यशवंतराव चव्हाण चौक, आडत बाजार, पाच कंदील चौक, रामआळी, लाटेआळी व घोडनदी वरील विसर्जन घाट यासर्व विसर्जन मार्गाची पाहणी यावेळी करण्यात आली.

    विजेच्या खांबावरील तारा व्यवस्थित करण्याबरोबरच गर्दीच्या आवश्यक ठिकाणी पुरेसे बॅरिगेट उभे करावेत. विसर्जन मार्गावरील दुकानांवर असणारे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित आहेत की नाही याची पाहणी करावी त्याचबरोबर आवश्यक आणि गरजेच्या ठिकाणी पालिकेने स्वतः सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत अश्या सूचना उपअधीक्षक यांनी केल्या.

    गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यांनीही यावेळी विविध सूचना मांडल्या व निर्विघ्नपणे व शांततेत गणेशोत्सव पार पडेल याची ग्वाही दिली.

    पोलीस उपअधीक्षक ढोले व मुख्याधिकारी पाटील यांनी विसर्जन मिरवणूक पाहणीच्या वेळेस प्रसिद्ध उद्योगपती तथा माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल, पुणे जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष संजय बारवकर, माजी नगराध्यक्ष नसीम खान, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण,माजी नगरसेवक मंगेश खांडरे, पूर्वमुखी हनुमान गणेश मित्र मंडळ सोनार आळी चे सुनील जाधव , माजी नगरसेवक विनोद भालेराव, शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती तुकाराम खोले, आरपीआयचे शहराध्यक्ष नीलेश जाधव, हलवाई चौक गणेश मित्र मंडळ चे अध्यक्ष अशोक काळे, हनुमान गणेश मित्र मंडळ मारुती आळीचे योगेश महाजन, यशवंतराव चव्हाण गणेश मित्र मंडळचे अध्यक्ष बाळासाहेब झोडगे, आझाद हिंद गणेश मित्र मंडळ सुभाष चौक चे कार्यकर्ते प्रमोद सांगवेकर, आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे रवींद्र सानप, रसिकलाल धारिवाल गणेश मित्र मंडळ आडत बाजारचे मितेश गादिया, समस्त सकल मराठा समाज संघचे सागर नरवडे, यांच्याशी चर्चा करून मते जाणून घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button