राष्ट्रीय
शिरूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन सभा
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 2r}: छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त स्वराज्य रक्षक फाउंडेशनच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी व शंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिरूर पोलीस ठाण्याचे पीआय संदेश केंजळे, पीएसआय नकाते, दिलीप पवार, राहुल भागवत, महिला पोलिस धनश्री जाधव व तृप्ती माकर यांच्यासह नगरसेविका स्वप्नाली जामदार, शशिकला काळे, सविता बोरुढे, उषा वाखारे, वैशाली साखरे, नगरसेवक उमेश शेळके, मनसे शहराध्यक्ष आदित्य मैड, कुंभार समाजाचे तालुकाध्यक्ष योगेश जामदार, नितीन जामदार, दादासाहेब घावटे,
नितीन गायकवाड, बाळू महाराज जोशी, निलेश नवले, अनिल गायकवाड, विजय नरके, किरण देशमाने, चैतन्य जामदार आदी उपस्थित होते.
-
तसेच ‘आम्ही शिरूरकर’ फाउंडेशनचे रवींद्र सानप, लोकजागृती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र धनक, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल पांडे, ॲड. प्रदीप बारवकर व जनता दलाचे प्रदीप बारवकर
यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. वक्त्यांनी संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेची आठवण करून देत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य रक्षक फाउंडेशनचे रवी लेंडे, प्रफुल्ल उबाळे, शुभम जाधव, सागर झाडगे, गणेश हांडे व राहुल लेंडे यांनी केले.





