Uncategorizedराष्ट्रीयविशेष
शिरुर दिनांक(वार्ताहर ) 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिन शिरुर शहर आणि परिसरात मोठ्या उत्सहाने साजरा करण्यात आला . ‘भारत माता कि जय ‘ , ‘वंदे मातरम’ च्या जयघोष यावेळी करण्यात आला .




यावेळी मुलानी देशभक्तीपर गीते, योगासने , मानवी मनोरे आदी चित्तथरारक कवायती सादर केल्या. इयत्ता दुसरी व तिसरीतील चिमुकल्यांनी भगतसिंग, वीर सावरकर, लोकमान्य टिळक , सरोजनी नायडू आदी देशभक्तांच्या वेशभूषा परिधान करून नाट्य छटा सादर केल्या.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ समीर ओंकार, सुधाकर पोटे, व्हि डी कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, गणेश मराठे, महादेव भाटकर, किशोरी लगड, जयश्री दांडगे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.





