Uncategorizedविशेष
ग्रामविकास व महिलांचे सक्षमीकरण या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल उद्योजिका व आदर्श सरपंच वर्षा काळे यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाउ पुरस्कार
-
शिरूर दिनांक (डेली न्यूज पोस्ट टीम -24 )ग्रामविकास व महिलांचे सक्षमीकरण या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशनचा वतीने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन उद्योजिका व तर्डोबावाडीचा आदर्श सरपंच वर्षा फक्कड काळे (पोटावळे ) यांना सन्मानित करण्यात आले.
पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात माजी आयएएस व माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला . यावेळी फाउंडैशनचे संस्थापक संजय पवार , उपप्राचार्य डॉ .प्रकाश चौधरी , प्रा. विलास आंबेकर आदी उपस्थित होते .तर्डोबाचीवाडी ता. शिरूर येथील शिक्षक उल्हासराव पोटावळे यांच्या कन्या व माजी सैनिक फक्कडराव काळे यांच्या पत्नी वर्षा उर्फ रोहिणी फक्कडराव काळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती वर मात करत स्वकर्तृत्वावर इतिहास घडविला .
तर्डोबाचीवाडी येथील सरपंचपदाची धुरा यशस्वीपणे त्यांनी सांभाळली . गावातील रस्ते ,स्वच्छता , पिण्याचे पाणी , शालेय सुविधासह महिला बचत गट उभारणीसह ग्राम विकासाची विविध कामे मार्गी लावली . गावासाठी विविध शासकिय योजना व शासनाचा विविध कल्याणकारी योजना लाभार्थ्यापर्यत पोहचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले . शासनाने या कामाची दखल घेत आदर्श सरपंच म्हणून त्यांचा गौरव केला.महिलांच्या सक्षमीकरणासाठी वर्षाताई यांनी आग्रह धरला. महिलांनी स्वतःच्या आर्थिक पायावर उभे राहिला पाहिजे या विचाराने त्या झपाटल्या.याची सुरुवात त्यांनी स्वतः पासून केली. कोणतीही व्यवसायाची उद्योगाची पार्श्वभूमी नसताना साईदीप इंटरप्राईजेस या नावाची कंपनी शिरूर लगतच्या कारेगाव एमआयडीसी मध्ये त्यांनी उभी केली. विशेष म्हणजे या कंपनीत दोनशेहून अधिक महिला काम करत आहे. त्याचबरोबर शंभरहून अधिक पुरुष कामगार काम करत आहे. अनेकांचे प्रपंच उभे करण्यात वर्षा ताईंचे मोठे योगदान आहे. परिसरात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या हेतूने साईदीप एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थिनींसाठी व विद्यार्थ्यांकरिता शिरूर मध्ये सूर्योदय कॉलेज ऑफ नर्सिंग सुरू केले आहे. भविष्यात शाळा व विविध व्यावसायिक कोर्सेस व पदवीचे शिक्षण चालू करण्याबाबत नियोजन सुरू आहे.अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकारी म्हणूनही काम करताना समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहे.
विविध सामाजिक स्वयंसेवी सेवाभावी संस्थांनी काळे यांच्या कार्याची दखल घेऊन विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.