शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशनचा वतीने राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार देऊन कर्डे येथील भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक एमसीव्हीसी विभागातील लिपिक आरीफा मुनीर पटेल यांना सन्मानित करण्यात आले.
पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात माजी आयएएस व माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला . यावेळी फाउंडैशनचे संस्थापक संजय पवार , उपप्राचार्य डॉ .प्रकाश चौधरी , प्रा. विलास आंबेकर आदी उपस्थित होते.
आरीका मुनीर पटेल यांचे एम. ए. बी. एड. शिक्षण झाले असून
पुणे जिल्हा शिक्षण मंडळांच्या श्री. भैरवनाथ विद्यालय करडे या विद्यालयात दि. ०७/१२/१९९२ पासून एमसीव्हीसी विभागाकडे लेखनिक म्हणून त्या कार्यरत आहे. एमसीव्हीसी विभागाचे काम सांभाळून माध्यामिक विभागाकडील पत्रव्यवहाराची व संगणकाची कामे, आरिफा पटेल यांनी केलेली आहे.
पटेल यांना
पुरस्कारा मिळाल्या बद्दल विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.