Uncategorized
शिरूर शहरातील अतिक्रमणांवर शिरूर नगर परिषदेची कार्यवाही
शिरूर दिनांक (डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
शिरूर नगरपरीषदेचा वतीने अतिक्रमणांवर हातोडा मारत ५० हुन अधिक टप -या व हातगाड्या वर कारवाई करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली.
पाटील यांनी सांगितले की गेल्या काही दिवसापासुन शिरूर शहरात टप-यांची संख्या वाढली होती. त्याच बरोबर अतिक्रमण संदर्भात नागरिकांच्या तक्रारीही आल्या होत्या.
ही कारवाई महिन्यापूर्वी करण्यात येणार होती परंतु ती स्थगित करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून ज्या ठिकाणी वाहतुकीला व रहदारीला अडथळा ठरत आहे अशा ठिकाणी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली.
वापराविना पडून असलेल्या हातगाड्या व टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई महिन्यापूर्वी करण्यात येणार होती परंतु ती स्थगित करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून ज्या ठिकाणी वाहतुकीला व रहदारीला अडथळा ठरत आहे अशा ठिकाणी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली.
वापराविना पडून असलेल्या हातगाड्या व टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. पाबळ फाटा, अहिल्यानगर रस्त्यावरील तहसील कार्यालयापर्यंत त्याचबरोबर सि.टी. बोरा कॉलेज रोड सेंटर शाळा लगत ही कारवाई करण्यात आली.

कारवाईमुळे रहदारीला मोकळा श्वास मिळेल असे पाटील म्हणाले.
गावातून जाणाऱ्या पुणे अहिल्यानगर रस्त्यावरील बी.जे कॉर्नर जवळ मोठ्या प्रमाणात वर्दळ असते बी.जे.कॉर्नर ते पुलापर्यंत मोठी वर्दळ व रहदारी आहे. या परिसरात हातगाड्या व अन्य अतिक्रमण नसावीत याबाबत विशेष दक्षता घेतली जाईल असे पाटील यांनी सांगितले.या अतिक्रमण विरोधी कारवाईतील पथकात शिरूर नगर परिषदेचे अतिक्रमण पथक प्रमुख पंकज काकड, समाधान मुगसे, शामली लाड, विद्युत अभियंता तेजस शिंदे , कर निरीक्षक माधव गाजरे, निरीक्षक दीपक कोल्हे, कार्यालयीन अधीक्षक राहुल पिसाळ, विजय आंधळे त्याचबरोबर मुकादम मनोज अहिरे व किरण जाधव यांचा समावेश होता.

दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेली ही कारवाई रात्री साडेसहा पर्यंत सुरू होती. पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचे ६० हून अधिक जणांचे पथक चार महिला पोलीस, चार पुरुष पोलीस व एक पोलीस अधिकारी यावेळी या कारवाईत सहभागी झाले होते. तीन जेसीबी 3 ट्रक, १डंपर ही होता.
बंद अवस्थेतील टपऱ्या, हातगाड्या व दुकानांचे बोर्ड या कारवाईत जप्त करण्यात आले.
बंद अवस्थेतील टपऱ्या, हातगाड्या व दुकानांचे बोर्ड या कारवाईत जप्त करण्यात आले. शहरांमध्ये हॉकर झोन पॉलिसी लागू करण्यासंदर्भात शासनाकडे माहिती देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

