
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम -२४}गेल्या अकरा दिवसापासून सुरु असणारा आनंदोत्सव असणारा गणेशउत्सवाच्या शेवटच्या दिवशी मोठया उत्साहात व थाटामाटात विघ्नहर्त्या श्री. गणेशास शिरूर मध्ये निरोप देण्यात आला.ओंसडून वाहणारा उत्साह व अलोट भाविकांच्या उपस्थितीत शिरुर शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.

रात्री उशीरा मानाचा गणेश मंडळाचा श्री गणेशाचा विसर्जनाने मिरवणुकीची सांगता झाली.
मानाचा पहिला गणपती असणाऱ्या रामआळी तील समस्त नामदेव शिंपी समाज ट्रस्टच्या श्रीराम मंदिरातील गणेशाची दुपारी एकच्या सुमारास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर यांच्या हस्ते राम मंदिरातील गणेशाची आरती झाल्यावर मुख्य विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली.

यावेळी ट्रस्टचे विवेक बगाडे, सिद्धेश्वर बगाडे, ऍड. नाना पाटेकर, महेश बोत्रे, संकेत गुजर,दत्तात्रेय क्षीरसागर, अमोल क्षीरसागर, मनोज पांढरकामे, डॉ. शिल्पा यशवंत घोडे आदी आदी उपस्थित होते. सायंकाळी या गणेशाचे लाटेआळीतील विसर्जन झाले.

मानाचा शिवसेवा मंदिर गणेश मंडळाच्या श्री. गणेशाची आरती मंडळाचे ट्रस्टी मनसुख गुगळे, ज्ञानेश्वर माऊली घावटे,ॲड .सुभाष पवार यांच्या उपस्थितीत झाली.टाळ मृदंगाच्या गजरात व आळंदी येथील वारकरी संस्थेचा बाल वारकरी समवेत ट्रस्टचा गणेशाची मिरवणूक निघाली.
सायंकाळ श्रीराम मंदिरातील गणेशाचे विसर्जन झाले .
हनुमान मंदिर व महाराणा प्रताप गणेश मित्र मंडळाच्या गणेशाची मूर्ती विसर्जनासाठी पालखीत विराजमान होती.गेल्या काही वर्षापासून या मंडळाची विसर्जन मिरवणूक पालखीतून व पारंपारिक वाद्याचा गजरात काढण्यात येत असल्याचे शिरूर वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ॲड . अमित खेडकर , ॲड अक्षय घावटे ,ॲड . प्रतिक काशीकर ,प्रीतेश फुलडाळे यांनी सांगितले .

शिरुर नगरपरिषद कामगार गणेश मंडळ , पाच कंदिल चौक गणेश मित्र मंडळ व छ्त्रपती शिवाजी गणेश मंडळ लाटेआळी या गणेशाचे दुपारी विसर्जन झाले .डंबेनाला गणेश मित्र मंडळ यशवंतराव चव्हाण चौक यांनी दुपारी तर सूरजनगर गणेश मित्र मंडळ , खारा मळा गणेश मित्र मंडळ येथील गणेशाचे सायंकाळी विसर्जन करण्यात आले.


















.जय भवानी मित्र मंडळ महाराणा प्रताप चौक काची आळी यांची गणेश मूर्ती अत्यंत आकर्षक अश्या गोल्डन रथात लक्ष वेधून घेत होती. या मंडळाचा मिरवणुकीत मोठया संख्येने महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.श्री. रसिकभाऊ धारिवाल गणेश मित्र मंडळ आडत बाजार यांच्या विसर्जन मिरवणुकीत झाँज पथक सह प्रसिद्ध दोस्ती बँड सह सहभागी होते. मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी आकर्षक असे मंदिर बनवले होते. प्रसिद्ध उद्योगपती व माजी नगरध्यक्ष प्रकाश धारिवाल मंडळाचे प्रमुख आधार स्तंभ असून मंडळाचा विसर्जन मिरवणुकीत ते सहभागी झाले होते.
श्री. स्वामी समर्थ गणेश मित्र मंडळ यांनी आकर्षण अशी सजावट विसर्जन मिरवणुकीसाठी केली होती.आझाद सोशल फाउंडेशन लाटेआळी यांची गणेशमूर्ती घोड्याच्या बग्गीत विराजमान होती.आखिल रामआळी गणेश मित्र मंडळ यांची गणेश मूर्ती श्रीराम रथात विराजमान होती.विठ्ठल मंदिर गणेश मित्र मंडळ कुंभार आळी यांनी आकर्षक असे मंदिर केले होते. पूर्वमुखी हनुमान गणेश मित्र मंडळ सोनार आळी यांच्या विसर्जन मिरवणुकीतील सिंहाची मूर्ती लक्ष वेधून घेत होती.
श्री.गणेशाची मूर्ती लक्ष्मी विष्णू शेष रथावर होती. मानाचा पाचवा असणारा गणपती हनुमान मित्र मंडळ कामाठीपुरा यांनी आकर्षक असे मंदिर साकारले होते.सिंहगर्जना गणेश मित्र मंडळ यांनी आकर्षक असा देखावा सादर केला होता. अजिंक्यतारा गणेश मित्र मंडळ यांचा श्री गणेश पुष्प रथात होता.मुंजोबा गणेश मित्र मंडळ भाजी बाजार यांची शारदा गजानन गणेशाची मूर्ती श्री. शंकर महाराज रथात विराजमान होती.
आखिल गुजर मळा् गणेश मित्र मंडळाची गणेश मूर्ती स्वामी समर्थ रथात होती.मुंजाबा मंदिर गणेश मित्र मंडळ यांचा गणेश आकर्षक असा मंदिरात होता.रामलिंग गणेश मित्र मंडळ करंजुले वस्ती यांच्या श्री गणेशाची मूर्ती आकर्षक अश्या रथावर आरुढ होती.


