Uncategorizedराष्ट्रीयविशेष

‘माझा गावची नदी , स्वच्छ नदी ‘ या संकल्पा द्ववारे शिरुर शहरातील घोडनदीच्या स्वच्छतेची मोहिम युवकांनी केली सुरु

दोन ट्रक्टर ट्रॉली कचराचे संकलन ,जास्तीजास्त शिरुरकरांनी घोडनदी स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे गंगा माता निसर्गराजा प्रतिष्ठानचे आवाहन

शिरुर शहरात घोडनदी स्वच्छता मोहिमे अंतर्गत नदीकाठावरील कचराचे संकलन करण्यात आले .
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम-24)शिरुर शहरा जवळून जाणा-या घोडनदीच्या किनारासह  नदी परिसराची  स्वच्छता करण्याचा संकल्प शहरातील युवकांनी  गंगामाता निसर्गराजा  प्रतिष्ठानचा माध्यमातून केला असून या युवकांनी सध्या दशक्रिया घाटाच्या शेजारील परिसरांची स्वच्छता मोहीम  सुरु केली आहे . जवळजवळ दोन ट्र्क्टर ट्रॉली भरेल एवढ्या कचरा व राडारोडाचे संकलन युवकांनी केले असून  ‘गावची नदी ,स्वच्छ नदी ‘ या संकल्पने द्वारे नियमितपणे ही स्वच्छता मोहीम सुरु ठेवण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी सांगितले .

दरम्यान आज या परिसरात छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती शिरुरचे अध्यक्ष माजी नगरसेवक रवींद्र धनक यांनी भेट देवून स्वच्छतेचा जागर व नदी संवर्धन व नदीचा परिसर चकाचक ठेवण्याचा दृष्टीने काम करत असलेल्या युवकांची भेट घेवून त्याच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन त्यांच्या पुस्तक देवून सन्मान केला .

शिवजयंती उत्सव समिती शिरुरचे अध्यक्ष माजी नगरसेवक रवींद्र धनक यांनी घोडनदीची स्वच्छता मोहीम राबविणारे गंगा माता निसर्गराजा प्रतिष्ठानचे प्रीतेश फुलडाळे , महेंद्र बोरा , राजेंद्र महाजन यांचा पुस्तक देवून सन्मान केला .
रवींद्र धनक यावेळी म्हणाले की
नदी व नदीचा परिसर स्वच्छ ठेवणे ही काळाची गरज असून नदीचे संवर्धन व स्वच्छतेसाठी प्रशासनाचा सहभागा व्यतिरिक्त सामाजिक संस्था , युवक , सेवाभावी संस्था व महाविद्यालयीन व शालेय  विद्यार्थी व लोकसहभाग महत्वाचा आहे.

oplus_131074

नदीच्या स्वच्छतेचे पर्यावरण संवर्धन दृष्टीने आरोग्याचा दृष्टीने असणारे महत्व लक्षात घेता नदी संवर्धन व स्वच्छता ही लोकचळवळ बनणे आवश्यक आहे . लोकसहभाग व युवकाचा सक्रिय सहभाग  व नियमितता , सातत्य व  याद्ववारे नदी स्वच्छता उपक्रम यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करुन नदी काठ परिसर स्वच्छता मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन धनक यांनी केले .

सामाजिक कार्यकर्ते प्रीतेश फुलडाळे यांच्या गंगा माता निसर्ग राजा प्रतिष्ठान द्वारे महेंद्र बोरा , ॲड.कोमल बोरा, प्रशांत बोरा, सिद्धार्थ बोरा, राजेंद्र महाजन, डॉ . मदन जोशी , राजू भाटी पत्रकार नितीन बारवकर  हे दररोज सकाळी सहा ते आठ असे दोन तास श्रमदान करून स्वछता मोहिमे राबवितात त्याद्ववारे त्यांनी दशक्रिया घाटाच्या शेजारील नदीचा काठ स्वच्छ करत दोन ट्रक्टर ट्रॉली कचराचे संकलन केले . नदीकिनारी जुन्या गोधड्या ,गाद्या , साड्या , कपडे , चिंध्या, औषधाची पाकिटे , राडारोडा, प्लॅस्टिक , निर्माल्य असा दोन ट्रॅक्टर ट्रॉली कचरा गोळा केला आहे .
दरम्यान हत्त्तीडोह परिसरात ही स्वच्छता मोहीम राबविणार असल्याचे महेंद्र बोरा व प्रीतेश फुलडाळे यांनी सांगितले असून जास्तीजास्त शिरुरकरांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे . दशक्रिया घाटावरती ही कचरा संकलन करण्याची व्यवस्था करावी असे ही ते म्हणाले .दशक्रिया घाटाचा शेजारील  वाहनतळाचा  मोकळ्या जागेत  बसून रात्री दारु पिण्याकरीता काही लोक येत असतात .याठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात येवून दारु पिण्यास प्रतिबंध करण्याची  मागणी काही नागरिकांनी केली आहे .
उद्योजिका व माजी सरपंच वर्षा काळे यांना डेली न्यूज पोस्ट टीमचा वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button