महाराष्ट्रविशेष

मोबाईल आणि आपण : समजून घेऊया वापर आणि परिणाम” या विषयावर आज २३ डिसेंबर रोजी शिरूर येथे व्याख्यान

लेखिका व पत्रकार मुक्ता चैतन्य यांचे व्याख्यान

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24} कुकडी वसाहत येथील स्वातंत्र्यसैनिक गोपाळसिंग परदेशी शिशुनिकेतन येथे स्वातंत्र्यसैनिक गोपाळसिंग परदेशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषीलोक विकास संशोधन संस्था संचलित या शिशुनिकेतनात मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.या व्याख्यानाचा विषय “मोबाईल आणि आपण : समजून घेऊया वापर आणि परिणाम” असा असून, मार्गदर्शक म्हणून मुक्ता चैतन्य (संस्थापक – सायबर मैत्र, मुक्त पत्रकार व लेखिका, डिजिटल वेल-बिइंग आणि सॉफ्ट स्किल ट्रेनर) उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे आयोजन जीवन विकास मंदिर येथे करण्यात आले असून, कुकडी वसाहत, शिरूर, जिल्हा पुणे येथे तो पार पडणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल वापराबाबत जागरूकता निर्माण करणे व त्याचे सकारात्मक-नकारात्मक परिणाम समजावून सांगणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.या कार्यक्रमासाठी  गंगाधर तोडमल ,  दिलीप शिंदे आणि सौ. निशाताई कोल्हे यांनी निमंत्रक म्हणून पुढाकार घेतला आहे.

सतीश शांतीलाल बोरा यांना डेली न्यूज पोस्ट टीमच्या वतीने विनम्र अभिवादन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button