विशेष

नागरिकांनी स्वतःची कर्तव्ये बजवावित : प्रा. डॉ. दीपक गायकवाड

लोकशाही क्रांती दिन कार्यक्रमात प्रतिपादन

oplus_131074

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम -२४ }
लोकशाही सुदृढ ठेवणारी हत्यारे हित संबंध जोपासणारी व खाजगी हिताची व स्वतःची काळजी घेणारे बनू पाहत आहेत अशा वेळेस नागरिकांनी स्वतःचे कर्तव्य बजावले पाहिजे. एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करत एकमेकांशी समता बंधुभाव आदर व न्यायाची भूमिका घेत लोकशाहीचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे मत महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातील सेवानिवृत्त प्रा. डॉ. दीपक गायकवाड यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड शरद पाटील यांच्या जयंती दिन शिरूर येथे लोकशाही क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त व कॉम्रेड पाटील यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त शिरूर रिक्रिएशन क्लब व “मुक्त द्वार वाचनालय” येथे डॉ. गायकवाड यांचे “लोकशाही आणि नागरी समाजापुढे असलेली आव्हाने” या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. सुभाष पवार होते.

लोकशाहीच्या सद्यस्थितीबाबत व समाजासमोरील प्रश्नांवर गायकवाड यांनी भाष्य केले. ते म्हणाले महागाई वाढत असून पैशाचे मूल्य कमी झाले आहे. सध्या सर्वत्र अशांतता निर्माण होत असल्याचे चित्र आहे. ताणतणाव वाढत आहेत. लोकशाही व्यवस्थेमध्ये नैतिकता महत्त्वाची आहे. श्रीलंका,बांगलादेश,नेपाळ या देशात घडलेल्या घटना आपोआप घडलेल्या नाहीत. अर्थव्यवस्थेतील मंदीची लक्षणे माणसात, राज्यात,देशात व शासनाच्या पद्धतीत दिसत असतात.
लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या आधी लोकसंसद आहे व लोक संसदेच्या आधी लोक आहेत.आजच्या राज्यकर्त्यांना लोकांच्या प्रति उत्तरदायित्व वाटत नाही त्यांना भांडवल व भांडवलदाराचा बाबत उत्तरदायित्व वाटते हे चित्र सर्वसामान्य नागरिक बदलू शकतात हा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला.
लोकशाहीत लोकांची प्रायव्हसी ही महत्वाची बाब आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
कायदाचा आदर करण्याबाबत सामान्य जनतेने राज्यकर्त्यांना सांगितल पाहिजे.
लोकशाही सुदृढ करण्यासाठी एकमेकांचा आदर करत शहाणपणाने एकमेकांशी संवाद साधत बंधूभाव जोपसत पुढे जावे लागेल. असे ही गायकवाड म्हणाले.
अध्यक्षीय मनोगतात ॲड. सुभाष पवार म्हणाले की लोकशाही मध्ये चर्चा,संवाद व विचार विनिमय महत्वाचे आहे.
प्रास्ताविक ग्रंथालयाचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनी केले. सूत्रसंचालन कल्पना मोरे यांनी केले तर आभार प्रा. चंद्रकांत धापटे यांनी मानले.
यावेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग थोरात,शिक्षण मंडळाचे माजी सभापती
ॲड. प्रदीप बारवकर, शिरूर नगरपालिकेच्या माजी सभापती ॲड. माया गायकवाड,काँग्रेस आय चे शहराध्यक्ष ॲड. किरण आंबेकर , ॲड. वसंत उबाळे, मावळाई प्रकाशनचे डॉ. सुभाष गवारी, डॉ. वैशाली साखरे, विलास गोसावी, प्रा. डॉ. मंदा काणे, प्रा. डॉ. क्रांती पैठणकर,ॲड. सतीश गवारी, ॲड. विक्रम पांचगे, संजय कौठावळे, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, लोकजागृती संघटनेचे अध्यक्ष ॲड. ओमप्रकाश सतीजा, नीलेश नहार, खुशाल गाडे, संदीप भोसले, मनोज कुलकर्णी, ॲड. दिलीप कांबळे, माजी मुख्याध्यापक देशमुख, अशोक संकपाळ, हाजी आसिफ खान, हाजी साबीरभाई, संभाजी जगताप, एम. डी. वाखारे आदी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button