शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम _२४) :
जागतिक लोकशाही दिन आणि ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड शरद पाटील यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजता शिरूर रिक्रिएशन क्लब व “मुक्त द्वार वाचनालय” (शिरूर नगरपरिषद ग्रंथालय बिल्डिंग, राम आळी) येथे विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
“लोकशाही आणि नागरी समाजापुढे असलेली आव्हाने” या विषयावर प्रा. डॉ. दीपक गायकवाड (सेवानिवृत्त प्राध्यापक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी) मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. सुभाष पवार हे राहणार असून या व्याख्यानातून लोकशाहीच्या सद्यस्थितीबाबत व नागरी समाजासमोरील प्रश्नांवर सखोल चर्चा होणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन शिरूर रिक्रिएशन क्लब व मुक्त द्वार वाचनालय यांनी संयुक्तरीत्या केले असून, आयोजकांच्या वतीने रविंद्र धनक, , मुहम्मद हुसेन पटेल व ग्रंथपाल सौ. कल्पना मोरे यांनी नागरिकांना या मुक्त चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या उपक्रमातून लोकशाहीच्या मूल्यांचा गौरव व सशक्त नागरी समाजासाठी भक्कम विचारमंथन घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.