Uncategorizedक्राईमराष्ट्रीय
शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट,-२४) मूल बाळ होत नसल्याने व मुलांच्या लळा लागल्याने तीन वर्षाच्या मुलाचे कारेगाव, ता. शिरूर येथून परप्रांतीय दांपत्यांकडुन अपहरण करण्यात आले होते.लुधियाना (पंजाब) मधुन या मुलाची सुखरुप सुटका पोलीसांनी केली असून
याप्रकरणी आरोपी 1) पुजादेवी उर्फ वनिता अर्जुन यादव वय ३७ वर्षे, 2) अर्जुनकुमार वकीलकुमार यादव वय ३६ वर्ष, दोन्ही रा.लोआलगान, चौसा, मधेपुरा, बिहार यांना अटक करण्यात आली आहे.
त्यांचे बिल्डींग मध्येच परप्रांतीय दांपत्य सौ. पुजादेवी उर्फ वनिता अर्जुन यादव व तिचे पती अर्जुनकुमार यादव मुळ रा. लोआलगान, चौसा, बिहार हे मागील आठ-दहा महिन्यापासुन भाड्याने राहण्यास आहेत.
त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाईल बंद लागत होते. त्यानंतर त्यांनी शेजारील लोकांच्या मदतीने आयुष, पुजादेवी यादव व तिचे पतीचा शोध घेतला पंरतु सापडले नाहीत . यादव हे आयुषला घेवुन परत येतील असे वाटल्याने त्यांची दोन दिवस वाट पाहिली. परंतु ते परत न आल्यामुळे काजल महेंद्र पडघाण यांनी पोलीस स्टेशनला पुजादेवी अर्जुन यादव व तिचा पती अर्जुन यादव यांचे विरुध्द आयुष वय 3 वर्षे याचे अपहरण केले प्रकरणी फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानुसार स्थानिक पोलीसांचे मदतीने रांजणगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने आरोपी 1) पुजादेवी उर्फ वनिता अर्जुन यादव वय 37 वर्षे, 2) अर्जुनकुमार वकीलकुमार यादव वय 36 वर्ष, दोन्ही रा.लोआलगान, चौसा, मधेपुरा, बिहार यांना शिताफिने ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातुन अपहरीत मुलगा कु. आयुष महेंद्र पडघाण याची सुखरूप सुटका केली.