Uncategorized

शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार विवाहित महिला एक पुरुष, एक तरुणी,एक मुलगा असे सात जण बेपत्ता व ३ मोटार सायकल चोरीच्या घटना

शिरूर : {डेली न्यूज पोस्ट टीम -२४}

 शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मागील दहा दिवसाच्या काळात एक पुरुष, एक तरुणी, चार विवाहिता व एक मुलगा असे सात जण बेपत्ता झाले आहेत तर तीन मोटर सायकल चोरीस गेल्याच्या घटना उघड झाल्या आहेत.
   बेपत्ता झालेल्या चार विवाहिते पैकी एकीचा मृतदेह तरडोबाच्या वाडी येथे भैरवनाथ मंदिरा जवळ नदीच्या पात्रात आढळून आला. माधुरी उर्फ सोनाली सिद्धेश्वर जगदाळे वय 32 राहणार मुक्ताईनगर, तरडोबाचीवाडी,ता – शिरूर जिल्हा – पुणे असे त्यांचे नाव आहे.

        याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माधुरी उर्फ सोनाली सिद्धेश्वर जगदाळे या कचरा गाडीमध्ये कचरा टाकण्यासाठी म्हणून बिल्डिंगच्या खाली आल्या होत्या. त्यावेळे पासून त्या बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली होती. त्याच्या मृतदेह घोडनदी पात्रात आढळून आला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष आदरणीय किशोर राजे निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  फरजाना मोसीन बागवान वय ३२ व उबेद मोसीन बागवान वय १२ दोघे ही  रा. भाजीबाजार, शिरूर  हे   आई व मुलगा माहेरी बोधेगाव, ता. शेवगाव जि. अहिल्यानगर येथे जाण्यासाठी म्हणून घराबाहेर पडल्या.त्या अद्याप पर्यत  माहेरी पोहोचल्या नाहीत.
चिंचणी ता. शिरूर येथील धावडे वस्ती वर राहत असलेल्या दुर्गा विठ्ठल थोरात वय – ३५ या घरातून कोण्यास काही एक न सांगता निघून गेल्या आहेत.
  सुरजनगर, शिरूर  येथील प्रज्ञा मिलिंद कांबळे वय -२३ ही महाविद्यालयीन शिक्षण घेणारी विद्यार्थिनी मोबाईल सह कोण्यास काही एक न सांगता घरातून निघून गेली  आहे.
अण्णापूर ता. शिरूर येथील पत्रा कुरुंदळे वस्ती येथे राहणारा उज्ज्वला राहुल कुरंदळे वय २८ या कोण्यास काही न सांगता घरातून निघून गेल्या आहेत.
मूळ चे मंगरूळ ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजी नगर येथील असणारे व सध्या मजूरी निमित्त नांगरगाव, ता. शिरूर येथे वास्तव्य करणारे दिनकर सुपदु दामोदर वय -५० हे ही घरात कोण्यास काही एक न सांगता निघून गेले आहेत.
या सर्व बेपत्ता प्रकरणा संदर्भातील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.
याखेरीज सुहास रोहिदास मुखेकर रा. कवठे येमाई, ता. शिरूर यांची शिरूर कोर्टाच्या आवारात पार्किंग केलेली हिरो कंपनीची  मोटारसायकल एम. एच. १२ एल. ई. ८२२१ चोरीस गेली. तर  शिरूर शहरातील पोस्ट ऑफिस समोरून सुभाष मच्छिन्द्र साठे यांची हिरो होंडा पॅशन एम. एच १६ सी. एन. ४७३५ ही गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अक्षय गोविंद घाडगे रा. घाडगे मळा, इनामगाव यांच्या घरासमोर लावलेली मोटार सायकल होंडा शाईन एम. एच. १२ एन. आर. ७०८३ ही चोरट्याने  चोरून नेली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button