
शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम _24)
बहुजन समाजा पर्यत ज्ञानगंगा पोहचविणारे डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त शिरूर येथे अभिवादन करण्यात आले.
शिरूर नगरपरिषद जुन्या इमारती मधील कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान शाहिदखान पठाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य डॉ. राहुल घावटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद कालेवार,,मुख्याध्यापक संजय मचाले
उपमुख्याध्यापक वर्षा खोमणे पर्यंवेक्षक आण्णासाहेब सरोदे,प्रा. शि्रीष भोसले,अमोल वर्पे, माजी उप मुख्याध्यापिका अपर्णा डोंगरे, नितीन बारवकर आदी यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी रयत शाळेतील विद्यार्थ्यांनी’ एक भारत सर्वश्रेष्ठ भारत’ या संकल्पने अंतर्गत विविध राज्याच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी केल्या होत्या.
त्याच बरोबर कर्मवीर भाऊराव पाटील, लक्ष्मी बाई पाटील, लोकमान्य टिळक, भारतमाता आदीच्या वेषभूषा ही विद्यार्थ्यांनी सादर केल्या होत्या.
डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी शाळा रयत शाळा न्यू इंग्लिश स्कूल येथे माजी मुख्याध्यापक अनिल शिंदे यांचे व्याख्यान
होणार असून विद्यार्थ्यांसह नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जाकिरखान पठाण मुख्याध्यापक संजय मचाले यांनी केले आहे.
