Uncategorizedक्राईम

घोडनदीत महिलेचा मृतदेह सापडला

शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -२४)

शिरूर तालुक्यातील तर्डोबाचीवाडी परिसरात घोडनदीच्या पात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत महिलेचे नाव सौ. माधुरी उर्फ सोनाली सिद्धेश्वर जगदाळे (वय ३२, रा. मुक्ताईनगर, तरडोबाची वाडी, ता. शिरूर, जि. पुणे) असे आहे.
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , १९ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास घरातील कामानिमित्त बाहेर गेलेल्या माधुरी जगदाळे या परतल्या नाहीत. त्यानंतर कुटुंबीयांनी शोध घेतला मात्र त्या मिळून न आल्याने त्यांचे हरवल्याची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात मानव मिसिंग रजिस्टर क्र. १५२/२०२५ अन्वये करण्यात आली होती.
दरम्यान, दुपारी १.०० वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिकांनी तरडोबाची वाडी येथील भैरवनाथ मंदिरासमोर घोडनदीच्या पात्रात महिलेचा मृतदेह दिसल्याची माहिती पोलीसांना दिली. घटनेची खबर मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष आदरणीय किशोर राजे निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

घेतली. कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटवली असता तो माधुरी जगदाळे यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय, शिरूर येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. या घटनेची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू (रजि. क्र. १२५/२०२५) म्हणून करण्यात आली आहे.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खटींग करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button