शिरूर : अजित नागरी सहकारी पतसंस्था व अजित मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या सह पत्नी मुलगा व ७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन बाळासो गरूड (वय 41, धंदा-शेती, रा. गणेगाव दुमाला, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणात दोन संस्थांमधील संस्थापक, अध्यक्ष, सचिव, खजिनदार, शाखा प्रमुख, व्यवस्थापक, वसुली अधिकारी आदींना आरोपी करण्यात आले आहे. त्यामध्ये –
अशोक कोंडीबा टेकवडे (संस्थापक), दिलीप नारायण वेल्हेकर (सचिव), बाळासाहेब माळे (खजिनदार),
अजिंक्य अशोक टेकवडे (सचिव), विजया अशोक टेकवडे (अध्यक्षा), दिनेश श्रीकांत घोणे (वसुली अधिकारी),
भुषण गायकवाड, सतिष महादेव जाधव (सरव्यवस्थापक), प्रदीप दिगंबर जगताप (शाखा प्रमुख), गणेश जगताप (कर्ज विभाग व्यवस्थापक) यांचा समावेश आहे.

सर्व आरोपी हूडको रोड, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे येथील राहणारे आहेत.
,दिनांक 28 मार्च 2019 रोजी फिर्यादी सचिन गरूड यांनी आपल्या यशराज ऍग्रो फुडस या व्यवसाय वाढीच्या करिता कर्जासाठी अर्ज केला होता. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीकडून गणेगाव दुमाला येथील गट क्र. 181/4 ही शेतीची मालमत्ता तारण ठेवून गहाण खत करण्यात आले. गहाण खत करून दिल्यावर कर्ज मंजूर झाल्याचे सांगण्यात आले
याच वेळी आरोपींनी गरुड यांच्याकडून एचडीएफसी बँक दौड शाखेचे तब्बल 15 ते 20 कोरे चेक सही करून घेतले. मात्र वेळोवेळी मागणी करून ही कर्जाची रक्कम देण्यात आली नाही. दरम्यान आपले कर्ज प्रकरण नाकरण्यात आले असे गरुड यांना वाटले.
याच वेळी आरोपींनी गरुड यांच्याकडून एचडीएफसी बँक दौड शाखेचे तब्बल 15 ते 20 कोरे चेक सही करून घेतले. मात्र वेळोवेळी मागणी करून ही कर्जाची रक्कम देण्यात आली नाही. दरम्यान आपले कर्ज प्रकरण नाकरण्यात आले असे गरुड यांना वाटले.
दरम्यान गरुड यांच्या कर्जाला जामीन असलेले कर्ज जामीनदार महादेव थोरात यांची कर्ज थकीत प्रकरणी गरुड यांच्या जमिनीचा ताबा मिळण्याबाबत ची नोटीस गरुड यांना आली. त्यावेळी थोरात व गरुड यांनी केलेल्या चौकशी नंतर फसवणूकीचा प्रकार उघडकीस आला.
आरोपींनी पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. पुणे येथे
दावा क्र. 101/1044/1197/2019 दाखल करून बनावट कागदपत्रे व पुरावे सादर केले. त्यावरून दिनांक 9 सप्टेंबर 2019 रोजी वसुलीचा खोटा दाखला मिळविला.
दावा क्र. 101/1044/1197/2019 दाखल करून बनावट कागदपत्रे व पुरावे सादर केले. त्यावरून दिनांक 9 सप्टेंबर 2019 रोजी वसुलीचा खोटा दाखला मिळविला. गरुड यांनी दिनांक 26 मार्च 2024 रोजी शिरूर पोलिस स्टेशन व सासवड पोलिस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दिला होता. न्यायालयाच्या आदेशावरून आता शिरूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा रजि. नं. 653/2025 भा.द.वि. कलम 406, 420, 34 अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. 

पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे करत आहे.
